Election Commission of India sakal
देश

Assembly Election: 5 राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार; ब्ल्यू प्रिंट तयार, काय असेल टाईमटेबल?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. आता निवडणूक आयोगाची तयारी देखील जवळपास पूर्ण झाल्याचे समजते. निवडणूक आयोगाने 5 राज्यांना भेटी देऊन निवडणुकीची संभाव्य ब्ल्यू प्रिंट तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये मतदानाचे वेगवेगळे टप्पे होतील. पाच राज्यांमध्ये 1 ते 2 टप्प्यात मतदान होणार असल्याचे समजते.(Assembly Election of 5 state election commission blue print)

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेनंतर निवडणूक कार्यक्रमाला अंतिम मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर घोषणा होईल. 10 डिसेंम्बपच्या आसपास निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. राजकीय नेत्यांच्या प्रत्यक्ष लढाईला सुरुवात होणार आहे.

सूत्रांच्या हवाल्याने, छत्तीसगडमध्ये दोन टप्यात मतदान होईल.मध्य प्रदेशात एका टप्प्यात मतदान शक्य आहे. मिझोराममध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान शक्य असल्याचं समजते. तेलंगणात एक टप्पात मतदान शक्य आहे. 10 ते 15 डिसेंबर दरम्यान मतमोजणी होईल. 10 डिसेंबरच्या आसपास निकाल लागेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT