assembly elections in four states Rajasthan Madhya Pradesh Chhattisgarh and Telangana congress vs bjp politics Sakal
देश

Assembly Elections 2023 Live Update : कमळ की पंजा? आज फैसला

सर्वपक्षीय नेत्यांची धाकधूक वाढली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मिनी लोकसभेची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कौल उद्या (ता.३) स्पष्ट होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे.

एखाद्या राज्यात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर पुढील जुळवाजुळव कशी करायची? याची रणनीती आतापासूनच आखली जाऊ लागली असून पडद्याआडच्या हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेसला मध्यप्रदेशात मोठ्या यशाची अपेक्षा असून राजस्थानचा गड राखण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. तेलंगणमध्येही आम्हीच विजयाचा गुलाल उधळू, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपनेही सर्वत्र आमचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

साधारणपणे सकाळी आठ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरूवात होणार असून संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सूचक विधान भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

हिंदी हार्टलँडमधील राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये थेट काँग्रेस व भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये थेट लढत आहे. तेलंगणमध्ये काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती यांच्यात सामना आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे कल पाहता विविध राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते.

या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अशोक गहलोत (राजस्थान), शिवराजसिंह चौहान (मध्यप्रदेश), भूपेश बघेल (छत्तीसगड), के. चंद्रशेखर राव (तेलंगण) या प्रस्थापित नेतृत्वाच्या भवितव्याचाही फैसला होईल.

मिझोराममध्ये मात्र सोमवारी (ता.४) मतमोजणी होणार आहे. येथील अनेक नेत्यांनी मतमोजणीची तारीख बदलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती, त्याला अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

मिश्रा दिल्लीमध्ये

भाजपला राजस्थानमध्ये विजयाची आशा आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कलराज मिश्रा आज दिल्लीत दाखल झाले. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीही राज्यपालांची भेट घेतली आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरेल. मध्यप्रदेशात भाजप नेत्यांनी भाजपला बहुमत मिळेल, असा दावा केला आहे.

काँग्रेसने निरीक्षक नेमले

निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे निरीक्षक चारही राज्यांतील आमदारांशी समन्वय ठेवण्याचे काम करतील. राजस्थानमध्ये निरीक्षक म्हणून हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा,

मधुसूदन मिस्त्री, मुकुल वासनिक आणि शकील अहमद यांची नेमणूक करण्यात आली असून तेलंगणची जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, दीपादास मुन्शी, अजोयकुमार, एम. मुरलीधरन आणि के.जे.जॉर्ज यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. छत्तीसगडसाठी पक्षाचे खजिनदार अजय माकन,

रमेश चेन्नीथाला आणि प्रितमसिंह यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मध्यप्रदेशची जबाबदारी अधीररंजन चौधरी, पृथ्वीराज चव्हाण, राजीव शुक्ला आणि चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

पक्षाचे सरचिटणीस आणि प्रभारी हे विविध राज्यांच्या निरीक्षकांसोबत समन्वय ठेवण्याचे काम करतील. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज तेलंगणमधील वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधताना त्यांना दिवसभर मतमोजणी होईपर्यंत बूथवर थांबण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT