assembly elections update five crore unaccounted cash seized in telangana election 2023  Esakal
देश

Assembly Election : मतदानापूर्वी पडला पैशांचा पाऊस! पाच राज्यात १७६० कोटी रुपये केले जप्त, निवडणूक आयोगाची माहिती

तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूकीसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

रोहित कणसे

तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूकीसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यादरम्यान गुरुवारी पोलिसांनी रंगारेड्डीच्या गच्चीबाउली येथे एका कारमध्ये पाच कोटी रुपयांची रोकड जब्त केली आहे. जेव्हा त्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली तर ते या रकमेचा ते हिशोब देऊ शकले नाहीत. अखेर पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चेकिंग दरम्यान एका कारमध्ये दोन सूटकेस सापडले. जे उघडून बघीतल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले. पोलिसांनीबॅगेतील कॅश जप्त खरत तिघांना ताब्यात घेतलं. यानंतर कॅश आयकर विभागाला सोपवण्यात आली.

यापूर्वी निवडणूक आयोगाने सांगितले होते की, पाच राज्यातील निवडणूकांदरम्यान आतापर्यंत तब्बल १७६० कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम जब्त करण्यात आली आहे. २०१८ मध्ये सापडलेल्या रकमेच्या तुलनेत हा आकडा सात पट अधीक आहे. राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय तपास यंत्रणा मिळून अशा कारवाया करत असतता. निवडणूकांच्या घोषणानंतर एमपी, मिझोरम, छत्तीसगड, तेलंगाना आणि राजस्थान मधून १७६० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. २०१८ मध्ये याच राज्यातून २३९.१५ कोटी रुपये जब्त करण्यात आले होते.

यापूर्वी गुजरात, हिमाचल, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटक येथे निवडणूक आयोगाने १४०० कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली होती. ही रक्कम मागील निवडणुकीत जब्त केल्याच्या ११ पट अधिक होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT