Atal Bihari Vajpayee Sakal
देश

Atal Bihari Vajpayee : 'या' मराठी खासदाराच्या एका मतामुळे चक्क वाजपेयींचं सरकारचं पडलं, पवारांचा होता हात

प्रभावी भाषण शैली, शब्दांचा नेमकेपणा यामुळे अटलजींनी लहान असूनही राजकारणात खूप आदर मिळवला.

Vaibhav Mane

Atal Bihari Vajpayee - अटलबिहारी वाजपेयी हे खूप लहानवयातच स्वदेशी चळवळीने प्रेरित झाले होते. शालेय काळातच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.

विद्यार्थी जीवनात असताना त्यांनी १९४२ मध्ये 'भारत छोडो' आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना तुरुंगात जावे लागले. तोच त्यांच्या जीवनातला महत्वाचा क्षण होता. कारण त्यावेळी त्यांना भारतीय जनसंघाचे प्रमुख श्यामा प्रसाद मुखर्जी यांची भेट झाली. तेव्हापासूनच त्यांच व्यक्तिमत्व राजकीय दृष्ट्या प्रभावी तयार होत गेलं, मुखर्जींचे निधन झाल्यावर अटलजींनी भारतीय जनसंघाचा देशभर विस्तार केला.

साल १९५७ मध्ये ते पहिल्यांदा संसदेवर निवडुन गेले. प्रभावी भाषण शैली, शब्दांचा नेमकेपणा यामुळे अटलजींनी लहान असूनही राजकारणात खूप आदर मिळवला. १९६८ च्या दशकात दीनदयाल उपाध्याय यांचे निधन झाले.

त्यानंतर अटलजी जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. नानाजी देसाई, बलराज मधोक आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत त्यांनी जनसंघ पक्षाला भारतीय राजकारणात विस्तारित रुप देण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले.

१९७७ ला भारतीय जनसंघ पक्ष आणि भारतीय लोकदल यांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जनता पक्षाची जलद वाढ आणि नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाचा परिणाम म्हणून, जनता पक्षाचे नेते मोरारजी देसाई असताना अटलजींना परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. प्रचंड मेहनती असलेल्या अटलजींच्या जीवनात अनेक सकारात्मक नकारात्मक प्रसंग आले.

त्यातल्या एका प्रसंगाची खूपच चर्चा झाली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष (bjp) आघाडी सरकारने १७ एप्रिल १९९९ रोजी एका मताने लोकसभेतील विश्वासदर्शक ठराव गमावला.

रामशेठ ठाकूर हे शेकाप पक्षात होते. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरुन रामशेठ ठाकुरांनी त्यांचं मत बाजूला दिलं आणि सन १९९९ कालावधीत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं सरकार कोसळलं, हा किस्सा खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या भाषणात एका सांगितलं होता.

रामशेठ ठाकूर यांच्या बद्दल...

रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर ते देणगी देण्यामुळे चर्चेत असतात. पक्ष कोणताही असो रामशेठ ठाकूर यांचे शरद पवार यांच्या सोबतचे चांगले संबंध हे चांगलेच राहिले आहेत. 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पाडणारे रामशेठ ठाकूर यांचे सुपुत्र प्रशांत ठाकूर हे सध्या भाजपमध्ये आहेत.

रामशेठ ठाकूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT