Atiq Ashraf Murder bloodstains and knife found in atiq ahmed office in prayagraj  
देश

Atiq Ashraf Murder : अतिकच्या कार्यालयात सापडले रक्ताने माखलेला चाकू, कपडे अन्… तपासात धक्कादायक गोष्टी उघड

रोहित कणसे

Atiq Ashraf Murder : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील माफिया अतिक अहमदच्या कार्यालयात तपासादरम्यान पोलिसांना रक्ताचे डाग आणि रक्ताने माखलेला चाकू देखील सापडला आहे. याशिवाय पोलिसांना रक्ताने माखलेले कपडे देखील आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर मीडिया रिपोर्टनुसार अतिकच्या कार्यालयात रक्ताने माखलेल्या बांगड्याही सापडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार माफिया अतिक अहमदचे प्रयागराज येथील चकिया येथे कार्यालय आहे. या कार्यालयाची दुरवस्था झाली असून उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक सोमवारी तपासासाठी येथे पोहोचले होते. येथे त्यांना रक्ताचे डाग दिसून आले. तसेच पायऱ्यांवर रक्ताचे ताजे डाग दिसत आहेत. पोलिसांना पहिल्या मजल्यावर एका महिलेची साडी आणि काही अंतर्वस्त्रे पोलिसांना सापडली आहेत. याठिकाणी महिलेचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच हत्येनंतर मृतदेह बाहेर कुठेतरी फेकून देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं की, हे डाग रक्ताचे असल्याप्रमाणे दिसत आहेत. एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले आहे.

चकिया कर्बला येथील माफिया अतिक अहमदचे हे कार्यालय योगी सरकारने दोन वर्षांपूर्वी पाडले होते. कार्यालयाचे काही अवशेष शिल्लक आहेत, तर निम्म्याहून अधिक भाग पीडीएने बुलडोझरच्या सहाय्याने पाडला. दरम्यान याच कार्यालयात सोमवारी रक्ताचे डाग दिसून आले. यासोबतच रक्ताने माखलेला चाकूही सापडला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासात दुसऱ्या मजल्यावरील स्वयंपाकघरात ठेवलेले सामानही अस्ताव्यस्त आढळून आले.

प्रयागराजचे एसीपी सत्येंद्र प्रसाद तिवारी म्हणाले की, आजच आम्हाला माहिती मिळाली की चकिया येथील (अतीक अहमद यांच्या) कार्यालयात रक्ताचे डाग दिसत आहेत. आम्ही एफएसएल टीमला चौकशीसाठी पाचारण केले आहे. खालच्या पायऱ्याजवळ लाल रंगाचे रक्ताचे डाग दिसतात आणि स्वयंपाकघराजवळ आतमध्ये रक्ताचे डागही दिसतात. आम्ही तपास करत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT