Atishi Marlena sakal
देश

Atishi Marlena : हरियाना सरकारने पाणी रोखले,आप;आतिशी यांचे उपोषण सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘हरियानातील हथनीकुंड धरणातून येणाऱ्या पाण्याचे दरवाजे हरियाना सरकारने बंद केल्याने दिल्लीत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे’’ असा आरोप दिल्लीच्या जलमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला आहे. हे पाणी मिळावे यासाठी त्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.

दिल्लीतील पाणी टंचाईसाठी दिल्ली सरकारने हरियाना सरकारला जबाबदार धरले आहे, तर भाजपने दिल्ली सरकारच्या अकार्यक्षमतेवर आरोप केले आहेत. दि यासंदर्भात दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांची भेट घेतली. आतिशी मार्लेना यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्यांचे वजन कमी झाले असून शरीरातील साखरेचे प्रमाणही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हरियाना सरकार दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडत नसल्याचा आरोप केला जात आहे. हरियाना सरकारतर्फे १०० लक्ष गॅलन पाणी कमी सोडले जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे दिल्लीतील २८ लाख लोकांना पाणी कमी मिळत असल्याचा आरोप होत आहे. ‘‘हथनीकुंड धरणात पाणी असूनही दिल्लीतील रहिवाशांसाठी हरियाना सरकार पाणी का सोडत नाही, असा सवाल सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Row: तिरुपती मंदिरात तूप पुरवणाऱ्या एआर डेअरीचा मालक कोण? काय करते कंपनी?

Actor Accident: 'माय नेम इज खान' फेम अभिनेत्याचा मोठा अपघात; आयसीयूमध्ये आहे परवीन डबास, प्रकृती गंभीर

Marathi New Movie : हिटलरच्या भूमिकेसाठी इतके अर्जदार ! ही आहे परेश मोकाशींच्या मुक्काम पोस्ट बोंबीलवाडीची भन्नाट कास्ट

Latest Marathi News Updates : आरळा-बेरडेवाडी-कोकणेवाडी रस्त्यासाठी पावणेसहा कोटी मंजूर- धैर्यशील माने

VBA First List: वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

SCROLL FOR NEXT