केरळ (Kerala) उच्च न्यायालयाने सोमवारी अभिनेत्रीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात (Atrocities on the actress) तीन साक्षीदारांची पुनर्तपासणी करण्यास परवानगी (Re-examine the witnesses) दिली आहे. या खटल्यातील अन्य पाच साक्षीदारांना समन्सही बजावले आहे. मल्याळम चित्रपट अभिनेता दिलीप हा देखील या प्रकरणातील एक आरोपी आहे. सोमवारी न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी राज्य सरकारचे अपील स्वीकारताना ट्रायल कोर्टाचा निर्णय बाजूला ठेवला.
ट्रायल कोर्टाने २०१७ च्या अभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरणात (Atrocities on the actress) आणखी अनेक साक्षीदारांना आणि आरोपींच्या फोन कॉल रेकॉर्डच्या साक्षांकित प्रतींना बोलावण्याची राज्य सरकारची विनंती नाकारली होती. या आदेशात (High Court Order) परवानगी दिल्यानुसार अतिरिक्त पुरावे सादर करणे हे आदेशाची प्रत मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत कोर्टाने केले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कोर्टाने म्हटले आहे की, अभियोग महासंचालक हे सुनिश्चित करतील की नवीन विशेष सरकारी वकील नियुक्त केले जातील किंवा इतर काही पर्यायी व्यवस्था केली जाईल. जेणे करून न्यायालय हे प्रकरण पुढे चालवू शकेल. ट्रायल कोर्टाने २१ डिसेंबर रोजी तीन साक्षीदारांना समन्स बजावण्याची परवानगी दिली होती. परंतु, इतरांना बोलावण्याची विनंती फेटाळली होती.
तक्रारीनुसार, तामीळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचे १७ फेब्रुवारी २०१७ च्या रात्री काही आरोपींनी अपहरण केले आणि सुमारे दोन तास कारमध्ये विनयभंग केला. काही आरोपींनी ब्लॅकमेल करण्यासाठी घटनेचा व्हिडिओ बनवला. या प्रकरणात दहा आरोपी असून त्यापैकी पोलिसांनी सुरुवातीला सात आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दिलीपला अटकही केली आणि नंतर त्याला जामीन मिळाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.