atyachar atyachar
देश

पती, मुलासमोर आईवर बलात्कार; चार महिन्यांनी आरोपींना अटक

आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये चार महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्काराची घटना घडली होती

सकाळ डिजिटल टीम

आंध्र प्रदेश : गुंटूरच्या मेडिकोंडूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पलादुगु साइड रस्त्यावरील सट्टानपल्ली येथील जोडप्यावर टोळीने हल्ला केला. आरोपींनी आधी पतीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पत्नीवर सामूहिक बलात्कार (Atrocities on women) केला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि चार महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपींना अटक (Accused arrested four months later) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये चार महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. पतीसमोर पत्नीवर अत्याचार करण्यात आला. घटनेवेळी महिलेचा मुलगाही तिथेच होता. पती विनवणी करीत होता; परंतु त्याचे आरोपींनी ऐकले नाही. मुलगाही आईला सोडण्याची विनवणी करीत होता. या टोळीने ३० हून अधिक बलात्काराच्या घटना घडवल्या होत्या.

काही दिवसांपासून गुंटूर जिल्ह्यात राहणाऱ्या टोळीच्या सदस्यांनी चोरीच्या मालिकेच्या घटनांमुळे पोलिसांची झोप उडवली होती. टोळीतील सदस्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. टोळीने दुचाकीवरून घरी परतणाऱ्या कुटुंबाला अडवून बेदम मारहाण केली. मुलासमोरच आईसोबत क्रूर कृत्य केले. पतीने थांबवल्यानंतर बेदम मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले.

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि बोटांच्या ठशांच्या आधारे टोळीचा सदस्य कुरनूल जिल्ह्यातील पन्याम भागातील रहिवासी असल्याचे समजले. पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले असता ते शेतात काम करण्याचा बहाणा करीत असल्याचे समोर आले. गुंटूर ग्रामीणचे एसपी विशाल गुन्नी यांनी सांगितले की, सहा आरोपींना अटक केली (Accused arrested four months later) आहे. दोन आरोपी फरार आहेत. आरोपींनी राज्यात ३० हून अधिक बलात्कार आणि लुटमार केल्याची कबुली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

Beed Election Voting: बीडमध्ये उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू; अपक्ष उमेदवाराच्या मृत्यूने हळहळ

Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?

Baramati: राष्ट्रवादी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची; शर्मिला पवार व अजित पवारही पोहोचले मतदान केंद्रावर...

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा

SCROLL FOR NEXT