Poonch Terror Attack Update
जम्मू आणि काश्मीरच्या पुंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारताने अनेक पधके तैनात केले आहेत. दरम्यान इंडिया टुडेने या हल्ल्यामागील तीन दहशतवाद्यांचे फोटो शेअर केले आहेत.
दहशतवादी हल्ल्यात भारतीय हवाई दलाचा एक जवान शहीद झाला आणि चार जण जखमी झाले होते, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंछ हल्ल्याच्या तपासात तीन नावे समोर आली आहेत. इलियास (पाक आर्मीचा माजी कमांडो), अबू हमजा (लष्कर कमांडर), आणि हदून, अशी दहशवाद्यांची नावे आहेत.
पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलासह इतर सुरक्षा दलांनी सुरनकोट पट्ट्यातील सुमारे 20 चौरस किलोमीटर परिसरात शोधमोहीम तीव्र केली असून पाच किलोमीटरहून अधिक परिसराचा शोध घेण्यात आला आहे.
ड्रोन आणि स्निफर डॉगसह पाळत ठेवणारी उपकरणे सज्ज, सुरनकोट पट्टा आणि पूंछ जिल्ह्यातील शाहसीतार, गुरसाई, सनई, लसाना आणि शिंद्रा टॉपच्या आसपासच्या भागात शोध मोहीम सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दल दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांची तीन ते चार छायाचित्रे परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून मिळाली आहेत आणि सुरनकोटमध्ये पोस्टर लावण्यात आले आहेत.
मुख्य संशयित समजल्या जाणाऱ्या दोन दहशतवाद्यांना पकडण्यासाठी 20 लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 26 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून काही सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.