ayodhya beneficiary meera got ayushman card by up government after pm modi meeting marathi news  
देश

PM मोदी फॅक्टर! पंतप्रधान चहा पिऊन गेले अन् कलेक्टरने घरी जाऊन दिलं आयुष्मान कार्ड

शनिवारी अचानक पंतप्रधान मोदी हे अयोध्या धाम जंक्शन येथून मंगेशकर चौक (वीणा चौक) येथील वस्तीत पोहचले होते, येथे त्यांनी मीरा मांझी यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली आणि चहा देखील घेतला.

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार (३० डिसेंबर) रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर होते. येथे त्यांनी विमानतळ आणि रेल्वे स्टेशनसह अनेक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या दौऱ्यावेळी खास बाब म्हणजे ते पीएम उज्वला योजनेच्या १० कोटीव्या लाभार्थी मीरा मांझी यांच्या घरी भेच दिली. इतकेच नाही तर पीएम मोदी यांनी त्यांच्या घरी चहा घेतला. मोदींनी दिलेल्या या भेटीची सर्वत्र चर्चा होत आहे.

उज्वला योजनेच्या या १० कोटीव्या लाभार्थी मीरा मांझी यांना योगी सरकारने मुख्यमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देखील देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देऊन गेल्यानंतर मीरा मांझी आणि सूरज मांझी यांना लगेच आयुष्यमान कार्ड देण्यात आले आहे. दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने तात्काळ आयुष्मान कार्ड मिळासं. इतकेच नाही तर अयोध्याचे जिल्हाधिकारी नीतीश कुमार यांनी स्वतः मीरा यांच्या घरी जाऊन त्यांनी आयुष्मान कार्ड दिलं.

यूपी सीएमओच्या वतीने पत्र जारी करत याबद्दल माहिती देण्यात आली होती. मुख्यमंत्री सचिव, संजय प्रसाद यांनी सांगितलं की, अयोध्येतील रहिवासी असलेल्या मीरा सूरज कुमार, पत्ता- ७५६ कन्धपूर यांना मुख्यमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शनिवारी अचानक पंतप्रधान मोदी हे अयोध्या धाम जंक्शन येथून मंगेशकर चौक (वीणा चौक) येथील वस्तीत पोहचले होते, येथे त्यांनी मीरा मांझी यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली आणि चहा देखील घेतला.

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भेट दिल्यानंतर मीरा मांझी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत याबद्दल मला माहिती नव्हती. एका तासांपूर्वी मला सांगण्यात आलं की एक राजकीय नेता भेटायला येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटायला आले. त्यांनी मुलांशी देखील संवाद साधला. मोदींनी मला विचारलं आज जेवण्यासाठी काय केलं आहे. दाळ, रोटी, भाजी केल्याचं मी सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला चहा करण्यास सांगितलं. चहा थोडा गोड झाला असल्याचं मोदी म्हणाले. पण, आमच्याकडे असाच चहा करतात असं मी त्यांना सांगितलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये निषाद कुटुंबियांची भेट घेतली यावेळी रविंद्र मांझी यांना अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT