Ayodhya Crowd News 
देश

Ayodhya Crowd News: अयोध्येला जाताय तर थांबा! गर्दीमुळे योगी प्रशासनाचा मोठा निर्णय

Sandip Kapde

Ayodhya Crowd News:

अयोध्येतील श्री राम मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी झाल्याने सर्व सीमा पुन्हा सील करण्यात आल्या आहेत. अयोध्येकडे कोणत्याही वाहनाला जाऊ दिले जात नाही. बांबूच्या खांबांसह ट्रॉली बॅरिअर्स लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. सीमा सील केल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बांबूच्या काठ्यांसह ट्रॉली बॅरिअर्स लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. सीमा सील केल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. येथून केवळ पासधारक, आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका, परीक्षार्थी, शेतकऱ्यांना डिझेल, पेट्रोल, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने यांची तपासणी आणि खातरजमा केल्यानंतरच सोडण्यात येत आहेत. (Ayodhya Ram Mandir News in Marathi)

पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला-

भगवे झेंडे घेऊन येणाऱ्या वाहनांना अयोध्येत प्रवेश दिला जात नाही. अयोध्येतील भाविकांची गर्दी रोखण्यासाठी दुहेरी बंदोबस्तात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील तडकाफडकी अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दीचे योग्य नियोजन न केल्यामुळे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर नाराज आहेत. त्यांनी हेलिकॉप्टरमधून राम मंदीर परिसराची पाहणी केली. सीआरपीएफकडे गर्दी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: रस्ते अडवून वाळीत टाकलं, मराठ्यांवर प्रचंड अन्याय सुरु; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

PM Modi Pune Visit: सिव्हिल कोर्टवरुन स्वारगेटला किती मिनिटांत पोहचणार? पंतप्रधान करणार अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन

Navi Mumbai: लॉजमध्ये बसून फेक नोटा छापत होतं जोडपं; कारमध्ये फिरायचे, दररोज ऑनलाईन फूड मागवायचे

Free Fire Max Redeem Codes : फ्री फायर प्रेमींसाठी खुशखबर! आजचे रिडीम कोड्स उपलब्ध,फ्रीमध्ये अनलॉक करा रिवॉर्ड्स

Post Office Schemes : पोस्टाच्या खात्यावर आता मोठ्या रकमेचे व्यवहार,पोस्ट-आयपीपीबीचे खाते करा लिंक

SCROLL FOR NEXT