Ayodhya Deepotsav 2023 
देश

Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येने मोडला स्वतःचा विश्वविक्रम! दिवाळीच्या पूर्वसंध्येला 22 लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित  

अयोध्यानगरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उजळून निघाली

Sandip Kapde

Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येत दिवाळी मोठ्या धुमधळाक्यात साजरी करण्यात आली. यावर्षी अयोध्यानगरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उजळून निघाली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोध्या शहरातील 51 घाटांवर 22 लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित करून ‘दीपोत्सवा’त स्वतःचा विक्रम मोडला.

अयोध्येत दिव्यांची रोषणाई करण्याची परंपरा 2017 मध्ये योगी आदित्यनाथ सरकारच्या स्थापनेपासून सुरू झाली. 2017 मध्ये 51,000 दिव्यांनी सुरुवात करून 2019 मध्ये 4.10 लाख, 2020 मध्ये 6 लाखांहून अधिक आणि 2021 मध्ये 9 लाखांहून अधिक दिवे लावले होते. (Latest Marathi News)

तर  2022 मध्ये, 17 लाखाहून अधिक दिव्यांनी ‘राम की पायरी’चा घाट प्रकाशित झाला होता. त्यावेळी पाच मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ प्रज्वलित राहिलेल्या दिव्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली होती.

यावर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी 14 वर्षांच्या वनवासानंतर प्रभू रामाच्या पौराणिक पुनरागमनाचे प्रतीक असलेला रथ ओढला. आदित्यनाथ यांनी प्रभू रामाचा प्रतिकात्मक राज्याभिषेकही केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT