ayodhya ram mandir janmabhoomi bhoomi pujan ramayan arun govil and deepika sita twitt 
देश

'रामायणा'तील 'राम-सीता' म्हणतात...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत असून, संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे. 80च्या दशकात टेलिव्हिजनवर गाजलेली मालिका 'रामायण' यात प्रभू श्रीराम आणि सीता यांची भूमिका साकरलेले अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनीही सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'रामायण' या गाजलेल्या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसवणारे अरुण गोविल यांनी अयोध्येत होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या रामभक्तांचे त्यांनी आभारही  मानले आहेत. ट्विटरवर त्यांनी म्हटले आहे की, 'अयोध्येत राम मंदिरासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने संघर्ष करणाऱ्या वरिष्ठ आणि त्यांचा संघर्ष भूमिपूजनापर्यंत घेऊन जाणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा कोटी कोटी प्रणाम. तुम्हा सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच आम्हाला हा दिवस पाहण्याचे सौभाग्य मिळत आहे. जय श्रीराम'

अरुण गोविल यांनी यापूर्वीही ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले होते की, 'भगवान श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाची वाट सर्व जनता करत आहे. अयोध्येत भूमिपूजनासोबतच एका दिव्य युगाचा आरंभ होणार आहे. जय श्रीराम' दुसऱया एका ट्वीटमध्ये लिहिले होते की, 'धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरात सुवर्ण कलश लावले तरीही नतमस्तक. मात्र, मंदिराच्या पायऱ्यांवरच व्हायचे आहे.' आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, '80च्या दशकात 'रामायण' या गाजलेल्या मालिकेतील सीतेची भूमिका साकरणाऱ्या दीपिका चिखलिया यांना राम मंदिर भूमिपूजनाची प्रतिक्षा आहे. कोरोनाच्या प्रादर्भावामुळे राम मंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहायला न मिळाल्याची खंत अभिनेत्रीला वाटत आहे.'

दीपिका चिखलिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करताना म्हटले आहे की, 'रामललाच्या घरी परतण्याची वाट पाहत आहे.'

दीपिका चिखलिया यांची इन्स्टाग्राम पोस्ट :
'अयोध्यानगरी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी येण्याच्या एक दिवस आधी अयोध्येला लागून असलेल्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. जे छोटे-मोठे मार्ग आहेत त्याठिकाणी बॅरिकेटींग लाऊन तपासणी सुरु ठेवण्यात येणार आहे. अयोध्याच्या शेजारील जनपद बस्ती, गोंडा, आंबेडकरनगर, बाराबंकी, सुलतानपुर, अमेठी या शहरांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अयोध्येत शरयू नदीच्या माध्यामातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सराकरची जलसेना तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही, राखीव दल, वाहतूक पोलिसांच्या तुकड्या रस्त्यारस्त्यावर तैनात करण्यात आल्या आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT