अयोध्येचे अनेक ऐतिहासिक किस्से आहेत. १ फ्रेब्रुवारी १९८६ वादग्रस्त बाबरी मशीद इमारतीचे कुलूप उघडण्याचे आदेश आले. नंतर फक्त ४० मिनिटात कुलूप उघडण्यात आले. यावर संपूर्ण देशात चर्चा झाली. लोक प्रतिक्रिया देऊ लागले. देशभरात निषेध आंदोलन देखील सुरु झाले. त्यानंतर ६ फ्रेब्रुवारीला बाबरी मशीद कृती समितीचा जन्म झाला.
१४ फ्रेब्रुवारीला मुस्लिम समाजाने देशभर शोक दिन पाळला. यानंतर विश्व हिंदू परिषदने देखील या लढ्यात उडी घेत कठोर भूमिका घेतली. जून १९८६ मध्ये विश्व हिंदू परिषदने वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याची मागणी केली. अयोध्येतील युद्ध या पुस्तकातील हा किस्सा आहे. हेमंत शर्मा यांनी हे पुस्तक लिहले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाने वेग पकडला होता. संपूर्ण देशातील विविध भागात राम-जानकी रथ फिरत होता. जातीय तेढ निर्माण होत असल्याचे कारण देत सरकराने ११ जून १९८६ ला या रथांवर बंदी घातली. मात्र मुस्लिमांनी देखील देशभर निदर्शने केली होती. त्यामुळे काँग्रेस सरकार बँकफूटवर गेले होते. काँग्रेस सरकारने अयोध्या प्रकरणात मार्ग शोधायला सुरुवात केली. विश्व हिंदू परिषदेला एकटे पाडण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. याची जबाबदारी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह यांना देण्यात आली. मंदिर झालं तर मंदिराचे बांधकाम सरकारी प्रायोजित ट्रस्टच्या माध्यमातून व्हावे, असा त्यांचा प्रयत्न होता.
पुस्ताक दिलेल्या माहितीनुसार राजीव गांधींना मंदिर बांधण्यासंदर्भात एक प्रस्ताव देण्यात आला. मशीदीचे तीन घुमट सोडून त्याच ठिकाणी खांबावर मंदिर बांधण्याचा तो प्रस्ताव होता. ज्याच्या खाली तीन घुमट असतील. राजीव गांधींनी त्या वेळी गृहमंत्री असलेले सरदार बुटा सिंह यांच्याकडे योजना लागू करण्याच्या शक्यता तपासण्याचे काम सोपवले. (Rajiv Gandhi News in Marathi)
राजीव गांधी इथेच थांबले नाहीत, त्यांनी अनेक मंदिर निर्माणासाठी अनेक गैर मार्ग शोधले. मुख्यमंत्री वीर बहादुर सिंह हे गोरखपुरचे रहिवासी होते. योगी आदित्यनाथ यांचे गुरु गोरखपीठाचे प्रमुख महंत अवैद्यनाथ यांच्याशी त्यांचे स्थानिक आणि जातीय संबंध होते.
अवैद्यनाथ हे राम मंदिर चळवळीचे नेते होते. मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह यांचे सुरक्षा अधिकारी देवेंद्र बहादूर राय हे होते. पुढे ते पैजाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक देखील झाले. ६ डिसेंबर १९९२ रोजी त्यांच्याच काळात बाबरी मशीदीचा ढाचा कोसळली होता. नंतर त्यांनी राजीनामा दिला. पुढे ते सुलतानपूरमधून भाजपचे खासदारही निवडून आले होते.
देवेंद्र बहादूर राय यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "मला एक दिवस वीर बहादूर सिंह यांचा फोन आला, त्यांनी विचारले तू गाडी चालवतोस का?. मी हो सांगितले. ते मला माझ्या गाडीतून लखनऊ येथे घेऊन गेले. निवृत्त आयकर अधिकारी मोहन सिंह यांच्या घरी आम्ही गेलो. मोहन सिंह आम्हाला एका खोलीत घेऊन गेले, जिथे रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ आधीच बसले होते. आम्हाला खोलीत नेल्यानंतर मोहन सिंह तिथून निघून गेले. त्यानंतर आम्ही तिघेच तिथे होतो."
यावेळी वीर बहादुर सिंह यांनी राम मंदिराचा प्रस्ताव ठेवला. राजीव गांधींना या मंदिरापासून भाजप आणि विश्व हिंदू परिषदेला दुर ठेवायचे होते. त्यानुसार वीर बहादूर सिंह म्हणाले, राजीव गांधी यांना राम मंदिर बांधायचे आहे. पण हे मंदिर केंद्र सरकार बांधेल. यामध्ये तीन अटी आहेत. पहीली अट केंद्र सरकार स्वखर्चाने एक मंदिर बांधणार आहे. दुसरी अट मंदिर उभारणीचा भाजपशी काहीही संबंध नसेल. तर तिसरी अट म्हणजे वादग्रस्त इमारती पाडल्या जाणार नाहीत. चहूबाजूंनी खांबांवर छत असेल आणि त्याच्या छतावर भव्य मंदिर बांधले जाईल. खालील रचना अबाधित राहील. योजना अशी आहे की विवादित ढाचा आधीच कमकुवत आहे. दुरुस्ती न करता ते काही दिवसात स्वतःच कोसळेल. मग तिथे फक्त रामजन्मभूमी मंदिर उरणार आहे.
मात्र या प्रस्तावावर महंत अवैद्यनाथ मोठ्याने हसले आणि म्हणाले की याचा भाजप आणि विहिंपला काय फायदा होईल? काँग्रेसला राजकीय फायदा होईल. त्यानंतर विहिंपच्या नेत्यांशी बोलून सांगतो, यावर ही बैठक संपली. पुढे अवैद्यनाथ यांनी हा विषय कधीच काढला नाही. याचा अर्थ अवैद्यनाथ यांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.