ayodhya ram mandir pran pratishtha invitation 
देश

Ram Mandir : काँग्रेसच नव्हे 'या' पक्षांनी देखील नाकारलंय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण; येथे वाचा संपूर्ण यादी

अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिरात भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या दिवशी भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.

रोहित कणसे

अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिरात भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या दिवशी भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. याखेरीज राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज, खेळाडू आणि अध्यात्माशी संबंधीत अनेक पाहुणे या कर्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमासाठी विरोधीपक्षातील नेत्यांना देखील निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. (ayodhya ram mandir pran pratishtha invitation)

मात्र देशातील सर्वात मोठा विरोधीपक्ष काँग्रेस पक्षातील नेत्यांनी हे निमंत्रण नाकारले आहे. काँग्रेससोबतच अनेक विरोधीपक्षतील नेते या कार्यक्रमाला गैरहजर असणार आहेत. बुधवारी काँग्रेसने याबद्दलची घोषणा करताच पुन्हा देशात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने काँग्रेसला राम विरोधी पक्ष म्हणत टीका केली आहे.

यादरम्यान आज आपण देशातील कोणत्या नेत्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे आणि असे कोण नेते आहेत ज्यांनी हे निमंत्रण नाकारलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

कोणत्या नेत्यांना निमंत्रण मिळालंय?

राम मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, राष्ट्रीय आणि इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना वैयक्तिकरित्या निमंत्रण पाठवण्यात आले होते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. विहिंपने राजदमधील लालू प्रसाद यादव यांच्याकडे वेळ मागितला आहे. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनाही निमंत्रणे पाठवली जाण्याची शक्यता आहे.

कोणत्या नेत्यांनी निमंत्रण नाकारलं?

'इंडिया' आघाडीच्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. बुधवारीच काँग्रेसने या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. हा कार्यक्रम भाजप आणि संघाचा असल्याचे पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी निवेदनात म्हटले आहे. येथे अर्धवट पूर्ण झालेल्या मंदिराचे उद्घाटन होत आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी निमंत्रण नाकारण्याचे संकेत दिले आहेत. त्यांना हे निमंत्रण विहिंपचे आलोक कुमार यांनी पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमंत्रणावर प्रश्न विचारला असता अखिलेश म्हणाले की, मी त्यांना ओळखत नाही, मी त्यांना कधी भेटलो नाही. आपल्या ओळखीच्या लोकांकडूनच आपण व्यवहार ठेवतो.

यापूर्वी सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारले होते. धार्मिक कार्यक्रमाच्या राजकारणाच्या निषेधार्थ ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे पक्षाने म्हटले आहे.

याशिवाय काँग्रेसचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनीही यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भपचे वर्चस्व असलेला कार्यक्रम आहे. आमचा कोणताही कार्यकर्ता यात सहभागी होणार नाही असे स्पष्ट केलं आहे.

कार्यक्रमाला कोण येणार?

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. यासोबत 22 जानेवारी रोजी जेव्हा राम लल्ला त्यांच्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत, तेव्हा अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेही यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी अडवाणी यांच्या उपस्थित राहणार असल्याबद्दल माहिती दिली आहे. आतापर्यंत त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे बोलले जात होते, मात्र आता त्यांची उपस्थिती निश्चित झाली आहे.

या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी सहभागी होणार आहेत. निमंत्रण त्यांना आधीच पाठवले होते. बुधवारी विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना पुन्हा एकदा कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली, जी त्यांनी मान्य केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना निमंत्रण दिल्याची माहिती विहिंपचे प्रमुख आलोक कुमार यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण मिळाले असून ते या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. हिमाचलमधील काँग्रेस सरकारचे मंत्री विक्रमादित्य सिंह 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विक्रमादित्य म्हणाले की, हा राजकीय मुद्दा नाही. देव समा मानणारा हिंदू म्हणून या वेळी उपस्थित राहणे ही त्यांची जबाबदारी आहे.

अजून कोणाला आमंत्रण मिळालेले नाही किंवा त्यांचं ठरलं नाहीये?

विहिंपने जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निमंत्रण दिले आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी यांनी गुरुवारी सांगितले की, पक्षाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांना अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. शरद पवारांनी नुकतेच सांगितले होते की, राम मंदिरात जेव्हा इच्छा असेल तेव्हा जाइल असं स्पष्ट केलं आहे.

आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मंदिराच्या उद्घाटनासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत आमंत्रित केले जाणार नाही कारण ते यावर राजकारण करण्याच्या विरोधात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT