Ayodhya Ram Mandir eSakal
देश

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत सापडले मंदिरांचे हजारो अवशेष! नव्या मंदिरातील संग्रहालयात भाविकांना पाहाता येणार

श्रीराम मंदिराचा पाया सुरवातीला सुमारे सात ते आठ एकर जागेत खोदण्यात आला. राजा मेघसेतुने १०-१२ व्या शतकात उभारलेल्या दोन मंदिरांचे शिलालेख तेथे सापडले.

विशेष प्रतिनिधी

अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी पाया खोदताना जमिनीपासून अवघ्या ६० फुटांवर विविध मंदिरांचे हजारो अवशेष, शिलालेख सापडले आहेत. त्यातून अयोध्या ही हजारो वर्षांपूर्वी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि सधन असल्याचे अधोरेखित झाले आहे. हे सुमारे सात हजार अवशेष आता नव्या मंदिरात होणाऱ्या संग्रहालयात भाविकांना पाहता येतील.

श्रीराम मंदिरासाठी पाया खोदताना कडेला पत्र्यांची चाळीस फूट उंचीची शेड उभारण्यात आली होती. तसेच आजूबाजूच्या इमारतींवरून छायाचित्रण करता येणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. त्यामुळे सापडलेल्या अवशेषांची माहिती तेव्हा जाहीर झाली नव्हती. मात्र, आता मंदिर निर्मितीची प्रक्रिया उघड होताना त्यातील रंजक गोष्टीही बाहेर पडू लागल्या आहेत. सापडलेले अवशेष, शिलालेख यांचे भारतीय पुरातत्त्व विभागाने ‘कार्बन डेटिंग’ केले आहे. त्यातून त्यांचा कालावधी निश्‍चित झाला आहे.

श्रीराम मंदिराचा पाया सुरवातीला सुमारे सात ते आठ एकर जागेत खोदण्यात आला. राजा मेघसेतुने १०-१२ व्या शतकात उभारलेल्या दोन मंदिरांचे शिलालेख तेथे सापडले. त्याखाली काही अंतरावर राजा स्कंदगुप्ताने सहा ते सातव्या शतकात बांधलेल्या मंदिरांचे अवशेष आणि काही शिलालेख सापडले. त्यानंतर खोदकाम करताना इ.स. पूर्वी बांधलेले मंदिर सापडले. त्यात भरत आणि हनुमान परस्परांना आलिंगण देतानाच्या मूर्तीचा समावेश आहे.

त्याच परिसरात इ.स. पूर्वीच्या ते पाच ते सहाव्या शतकातील तांब्याचे घंगाळे, कलश आदी भांडीही सापडली. तेथे धान्य ठेवायच्या कणग्या आढळल्या. या कणग्या भाजलेल्या मातीपासून तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरात नऊ विहिरीही सापडल्या. त्यातही अनेक अवशेष, लोकजीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू सापडल्या. सुंदर काठ आणि पायऱ्या असलेल्या या विहिरी इ.स. पूर्वीच्या होत्या.

मंदिरांचे अवशेष, शिलालेख, दैनंदिन जीवनातील वस्तू यावरून सुमारे तीन हजार ५०० वर्षांपूर्वीही अयोध्येत चांगली मोठी वस्ती होती, हे ग्राम सधन होते, लोकं शिक्षित आणि सुशिक्षित होती, हे उघड झाले आहे, असे श्रीराम जन्मभूमी न्यासातील सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ‘कार्बन डेटिंग’मुळे सापडलेल्या अवशेषांचा, शिलालेखांचा आणि वस्तूंचा कालावधी निश्‍चित झाला आहे आणि त्याला शास्त्रीय आधारही मिळाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कृत्रिम टेकडीवर मंदिर

श्रीराम जन्मभूमी शरयू नदीपासून जवळ असल्यामुळे खोदकामादरम्यान पाण्याचे जिवंत स्रोतही सापडले. तसेच विपुल प्रमाणात माती असल्यामुळे त्यावर मंदिराचे बांधकाम करणे शक्य नव्हते. त्यामुळे आयआयटी चेन्नईच्या मदतीने विशिष्ट प्रकारचे काँक्रिट वापरून कृत्रिम टेकडी तयार करण्यात आली आणि त्यावर श्रीराम मंदिर साकारले.

मंदिराच्या बांधकामाचा दगड रेड-पिंक का?

श्रीराम जन्मभूमीसंदर्भात न्यायालयीन लढा सुरू असताना १९९६-९७ दरम्यान अशोक सिंघल यांनी मुंबईत एक बैठक आयोजित केली होती. न्यायालयाचा निकाल राम जन्मभूमी न्यासाच्या बाजूने लागला तर मंदिर उभारणी कशी करावी, यावर त्या बैठकीत चर्चा झाली. सिंघल यांच्यासह बिर्ला उद्योग समूहाचे घनश्यामदास बिर्ला, ‘एल अँड टी’चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मुकुंद नाईक त्यात उपस्थित होते.

त्या वेळी मंदिराची उभारणी रेड-पिंक दगडातून करायची, असे सिंघल यांनी सांगितले. चर्चेत त्यावर सहमती झाली. हा दगड राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील बन्सी पहाडपूर येथे विपुल प्रमाणात मिळू शकेल, असेही त्या वेळी चर्चेत आले होते. पुढे न्यासाच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला आणि आता भरतपूरमधील दगडाचा वापर मंदिर उभारणीसाठी होत आहे. त्याच्या जोडीला कर्नाटक आणि तेलंगण येथून आणलेला ग्रॅनाइटही वापरला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

Accident: खोपोलीजवळ बस अन् टेम्पोचा मोठा अपघात, ९ जण जखमी

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

SCROLL FOR NEXT