Azam Khan esakal
देश

Azam Khan: आझम खान यांची आमदारकी रद्द; द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात ठरले होते दोषी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना 2019 च्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. रामपूर न्यायालयाने गुरुवारी आझम खान यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी 2000 रुपयांच्या दंडासह तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. (Azam Khan news in Marathi)

खान यांना दोषी ठरवल्यानंतर, यूपी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केले की सपा नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांची आमदारकी रद्द करण्यात येत आहे.

रामपूर न्यायालयाने आझम खान यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात चिथावणीखोर टिप्पणी केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

आझम खान यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 153ए (दोन गटांमधील वैर वाढवणे), 505 (सार्वजनिक गैरव्यवहारास कारणीभूत असलेले विधान) आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT