Chennai Trolling death  sakal
देश

Social Media Trolling: आईच्या कुशीतून निसटल्याने बाळ बाल्कनीत पडलं, लोकांनी ट्रोल केल्यानं आईनं जीवन संपवलं

Chennai News: चेन्नईतील एका इमारतीत एक बालक चौथ्या मजल्यावरून पडून शेडला लटकल्याचा एक विडीयो खूप व्हायरल झाला होता | A video of a child falling from the fourth floor and hanging from a shed in a building in Chennai went viral Video

Chinmay Jagtap

Channai News: चेन्नईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियाच्या ट्रोलिंगला कंटाळून एका आईने आपले जीवन संपवले आहे.

यामुळे तिची दोन्ही मुलं अनाथ झाली आहेत. चेन्नईतील एका इमारतीत एक बालक चौथ्या मजल्यावरून पडून शेडला लटकल्याचा एक व्हिडीयो खूप व्हायरल झाला होता. त्यावेळी खूप प्रयत्नांनंतर त्या बालकाला वाचवण्यात यश आले होते. मात्र नंतर बालकाच्या आईला खुप ट्रोल करण्यात आले. (marathi desh news)

28 एप्रिल रोजी आईच्या कुशीतून ते मुल निसटले होते. यावेळी ते मुल दुसऱ्या मजल्यावरील एका शेडमध्ये अडकले. यावेळी त्याला वाचवण्यात आले. मात्र महिलेच्या शेजाऱ्याने सोशल मीडियावर क्लिप पोस्ट केली. आणि ती व्हायरल झाली.

यावेळी सोशल मीडियावर लोकांनी आपला जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले. मात्र आईवर टीका करत तिला चांगलेच ट्रोल केले. तिच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला.(national viral video news)

कोईम्बतूरमधील करमादई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेनंतर महिला खूप तणावात होती. होत असलेल्या ट्रोलिंगमुळे ती कंटाळली होती. ट्रोलिंगला कंटाळून ही महिला दोन आठवड्यांपूर्वी पती आणि मुलांसह तिच्या माहेरी गेली होती.

इथेही तिला होणारा त्रास कमी झाला नाही. शेवटी कंटाळून तिने आपले जीवन संपवले. महिलेला दोन मुले असून त्यापैकी एक पाच वर्षांचे तर दुसरे आठ महिन्यांचे आहे. (viral video breaking news)

तज्ज्ञांच्या मते,सोशल मीडियावर अपमानास्पद भाषा किंवा कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह ट्रोल वापरल्यास ते सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत येते.यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT