Badaun Double Murder Case Esakal
देश

Badaun Double Murder Case: ना आजारी, ना गरोदर.. साजिदनं पत्नीच्या आजारपणाचं दिलं खोटं कारण अन् निष्पाप मुलांचा घेतला बळी, का रचला कट?

Badaun Double Murder Case: उत्तर प्रदेशातील बदायूं येथे दोन निष्पाप मुलांची एका नराधमाने हत्या केली. आरोपी साजिदने दोन मुलांची हत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणात नव नवीन ट्विस्ट समोर येत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Badaun Double Murder Case: बदायूं येथील दुहेरी हत्याकांडात नवा ट्विस्ट आला आहे. दोन निष्पाप मुलांची हत्या केल्यानंतर पोलीस चकमकीत ठार झालेला साजिद, हत्या केलेल्या मुलांच्या घरी पत्नी आजारी आहे असे सांगत पाच हजार रुपये उसने घ्यायला गेला होता, त्याची पत्नी बरी आहे, ना ती रुग्णालयात दाखल आहे, ना ती गर्भवती आहे. अशा स्थितीत साजिदने संपूर्ण नियोजन करून मुलांची हत्या केली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका वृत्तवाहिनीने साजिदच्या दादमई येथील सासरच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली.

साजिदची पत्नी सना म्हणाली की, आम्ही गेल्या १५ दिवसांपासून मी माझ्या आईच्या घरी आहे. मी गेल्या बुधवारी साजिदशी शेवटचे बोलले होते. माझ्याकडे फोन नाही आणि आईच्या फोनमध्ये रिचार्ज नव्हता, त्यामुळे आम्ही बोलू शकलो नाही. साजिदने असे का केले, मला माहीत नाही. सकाळी मोबाईलवर पाहिल्यानंतर मला ही घटना समजली.

साजिदची सासू मिस्कीन यांनी सांगितले की, साजिदने खूप चुकीचे काम केले आहे, पण त्याच्या हत्येमुळे माझ्या मुलीचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. माझी मुलगी बरी आहे, तिला कोणताही आजार नाही. ती तुमच्या समोर आहे. आता साजिदने पाच हजार रुपये का मागितले हे कळत नाही.

ही घटना मंगळवारी रात्री बदायूंतील मंडी समिती चौकीजवळील बाबा कॉलनीत असलेल्या विनोदच्या घरात घडली. साजिदने विनोद आणि संगीता यांच्या दोन निष्पाप मुलांचा गळा चिरून हत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. साजिदच्या मृत्यूमुळे गुन्ह्याचा उलगडा होण्याची आशा धूसर झाली आहे.

या घटनेबद्दल मुलांच्या आईने काय सांगितले?

मुलांची आई संगीता म्हणाली की, मी माझ्या घरात कॉस्मेटिकचे दुकान चालवते, माझे पार्लरही आहे. संध्याकाळी साजिद घरी आला आणि आधी क्लचर मागितला, तो दिला. त्यानंतर काही वेळाने त्याने 5000 रुपयांची मदत मागितली. मी माझ्या पतीशी बोलून त्याला 5000 रुपये दिले. तेव्हा त्याने तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आणि असे म्हणत तो गच्चीवर गेला.

आयुष आणि युवराज ही दोन्ही मुले घराच्या टेरेसवर खेळत होती. मुलांच्या आजीने सांगितले की, साजिदने हनीला पाणी घेऊन बोलावले होते. हनी पाणी घेऊन वरच्या मजल्यावर गेला होता. काही वेळाने किंचाळण्याचे आवाज येऊ लागले आणि साजिद हातात मोठा चाकू होता तो रक्ताने माखला होता.तसाच तो टेरेसवरून खाली उतरत होता.

मुलांची आजी मुन्नी देवी यांनी सांगितले की, साजिदने त्याची सून संगीता हिला सांगितले होते की, त्याची पत्नी ॲडमिट आहे. माझी पाच मुलं गेली आहेत. यावेळी प्रसूतीसाठी पैशांची अडचण आहे. यानंतर सून संगीता हिने मुलाला फोन केला असता त्याने पैसे देण्यास सांगितले.

सुनेने साजिदला सांगितले की,सगळं काही ठीक होईल, काळजी करू नको, ती त्याच्यासाठी चहा बनवायला आत गेली. यानंतर साजिद म्हणाला की, मला अस्वस्थ वाटत आहे मग तो टेरेसवर गेला. त्याने मोठ्या मुलाला सोबत नेले आणि तेथेच चाकूने वार करून त्याची हत्या केली.

या घटनेबाबत मृत मुलांचे वडील विनोद यांनी सांगितले की, आमचे त्यांच्याशी कोणतेही वैर नाही. तो न्हावी म्हणून काम करायचा. साजिद आणि जावेद हे दोघे सख्खे भाऊ होते. आम्हाला न्याय हवा आहे. जावेदला पकडले पाहिजे म्हणजे आमच्या मुलांना का मारले हे कळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT