Saina Nehwal On PM Modi Sakal
देश

PM मोदीचं सुरक्षित नसतील तर, देशाच काय? : सायना नेहवाल

सुशांत जाधव

नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा ताफा अडवल्याच्या प्रकरणाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या सर्वोच्च नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत या प्रकरणावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यात आता भारताची स्टार शटलर सायना नेहवालनेही उडी घेतलीये. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात घडलेला प्रकार हा चुकीचा आहे, अशा आशयाची भूमिका सायना नेहवालने मांडली आहे. पंजाबमध्ये घडलेला प्रकार हा निंदणीय असल्याचेही तिने म्हटले आहे. (Badminton Star Saina Nehwal on Obstructing PM Modi Convoy In Panjab)

सायना नेहवालने ट्विटच्या माध्यमातून पंजाबमध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. ज्या देशात पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड होत असेल तर ते राष्ट्र सुरक्षित असू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते, अशा आशयाचे ट्विट सायना नेहवालनं केले आहे. जर देशाचे पंतप्रधानचं सुरक्षित नसतील तर आपण देश सुरक्षित असल्याचा दावाच करु शकत नाही, असा संतप्त सवाल तिने उपस्थितीत केलाय.

दोन वर्षांपूर्वीच सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर प्रभावित होऊन राजकारणात येण्याचे प्रोत्साहन मिळाल्याचे ती म्हणाली होती. त्यानंतर एका बाजूला ती कोर्टवर खेळत असली तरी दुसऱ्या बाजूला ती राजकीय भूमिकाही मांडताना दिसत असते. उत्तर प्रदेशमधील जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालानंतरही तिने सत्तारुढ भाजपला विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सायना नेहवालने (Saina Nehwal) यावेळी केलेल्या ट्विटमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनांही सायनाने टॅग केले होते. त्यावेळी सायना नेहवालला टिकेचा सामना करावा लागला होता. सायना 'सरकारी शटलर' असल्याचा टोलाही तिला लगावण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT