Bageshwar Dham Sarkar : सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून बागेश्वर धाम महाराजांविषयी बोलल्या जात आहे. किर्तनकार धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते देशात अंधश्रद्धा पसरवत आहेत, असा आरोप केला जात आहे. त्यांच्याकडे कोणतीही सिध्दी नसून ते लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. धीरेंद्र शास्त्रींवर अंधश्रध्दा निर्मुलन समितीने आरोप केला आहे. याविषयी शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शास्त्रींनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, मी कोणाला घाबरत नाही. हिंदू वाघ आहेत, पळपुटे नाहीत. इथे लोकांनी श्रीरामांना नाही सोडलं. त्यांच्यावरही आरोप लावले होते. श्रीरामांना ते असण्याचा पुरावा मागितला. मी तर सामान्य माणूस आहे. मला कसे सोडतील.
शास्त्रींवर अंनिसच्या श्याम मानव यांनी अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप केला आहे. त्यांनी बागेश्वर शास्त्रींना आव्हान दिले की, नागपुरमध्ये आमच्या व्यासपीठावर येऊन चमात्कार दाखवा. जर त्यांनी असं केलं तर त्यांना ३० लाख रुपये देण्यात येतील.
असं म्हटलं जातं की, शास्त्री यांनी हे आव्हान स्वीकारलं नाही आणि तिथून निघून गेले. लोकांचं म्हणणं आहे की, घाबरून नागपूरमधून निघून आलेत. पण शास्त्रींचं म्हणणं आहे की, ते कोणालाही घाबरून परत आलेले नाहीत. त्यांना कोणाच्या सर्टिफीकेटची गरज नाही. मी ७ दिवसांचीच कथा करतो. ज्याला चमत्कार बघायचा आहे त्याने बागेश्वर दरबार मध्ये यावं. ते म्हणाले श्याम मानव यांनी रायपुरला यावं, तिकीटाचा खर्च मी देईन.
बागेश्वर धाम महाराज म्हणतात की, आम्ही दावा करत नाही की, तुमच्या सर्व समस्या सोडवू. मला माझ्या देवावर विश्वास आहे. तेच लोकांचा त्रास दूर करतात. हनुमानजींची पुजा करणं, प्रचार करण्यात काय चुक आहे?
बागेश्वर धाम महाराजांविषयी थोडक्यात
ते मध्यप्रदेशातल्या छतपूर जिल्ह्यात राहतात. बागेश्वर दरबारात लाखोंनी भाविक आपल्या समस्या घेऊन जातात. धीरेंद्र शास्त्री हे जगभरात बागेश्वर धाम सरकार (महाराज) नावाने प्रसिध्द आहेत. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होतात. यूट्युब वरही लाखोंनी लोक त्यांना ऐकतात. बऱ्याच ठिकाणांहून कथा करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. नागपूरमध्ये त्यांची कथा १३ जानेवारीपर्यंत होणार होती. पण ते ११ जानेवारीलाच तिथून निघून गेले. त्यानंतरच हा वाद पेटला.
त्यांच्या विषयी सांगितलं जातं की, ते लोकांच्या मनातलं ओळखू शकतात. एवढंच नाही तर ते त्यांच्या दरबारात येणाऱ्या लोकांच्या फोनचा नंबर, घरात ठेवलेल्या वस्तूंविषयीपण सांगतात. त्यांच्या या सिध्दी सगळ्यांसमोर सिध्द करण्याचं आव्हान अंनिस ने त्यांना दिलं होतं. याविषयी देशभरात वाद उठला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.