Gurugram in Haryana esakal
देश

प्रेमाच्या जाळ्यात 9 जणांना अडकवलं, नंतर ठेवले शरीरसंबंध; महिलेचा प्रताप पाहून न्यायालयही चक्रावलं!

एका मुलाच्या आईनं तिच्याविरोधात तक्रार केल्यानंतर, या महिलेविरुद्धचा गुन्हा उघडकीस आला.

सकाळ डिजिटल टीम

एका मुलाच्या आईनं तिच्याविरोधात तक्रार केल्यानंतर, या महिलेविरुद्धचा गुन्हा उघडकीस आला.

चंदीगड : हरियाणातील गुरुग्राममध्ये (Gurugram in Haryana) राहणाऱ्या एका महिलेनं एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीची कारागृहात रवानगी केली. काही दिवसांनी परत महिलेनं दुसऱ्या एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्या आरोपीचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली.

अशाप्रकारे महिलेनं एकामागून एक अशा 9 पुरुषांना लक्ष्य केलं. महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळले. तपासाअंती पोलिसांनी महिलेविरुद्ध कागदपत्रं गोळा करून तिची कारागृहात रवानगी केली. यानंतर या महिलेनं पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात (Punjab-Haryana High Court) जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या खंडपीठानंही महिलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

महिला चालवत होती खंडणीचं रॅकेट

उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वकिलांनी महिलेविरुद्ध कागदपत्रं दाखल केली. ही महिला खंडणी व खंडणीचं रॅकेट चालवते, अशी माहिती मिळाली. यानंतर उच्च न्यायालयानं प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेतली. त्यानंतर न्यायालयानं म्हटलं की, 'याचिकाकर्त्याला विविध व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची सवय आहे. त्यामुळं त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. ही महिला 27 जानेवारी 2022 पासून तुरुंगात आहे.'

पोलिसांच्या तावडीत 'अशी' अडकली महिला

एका मुलाच्या आईनं तिच्याविरोधात तक्रार केल्यानंतर, या महिलेविरुद्धचा गुन्हा उघडकीस आला. मुलाच्या आईनं पोलिसांना सांगितलं की, एका महिलेनं माझ्या मुलाला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या मुलाची त्या महिलेसोबत मैत्री होती. ते एकमेकांना चांगलं ओळखत होते. डेटवर जायचे आणि दोघांनी संमतीनं शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर महिलेनं माझ्या मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळले. तिनं आणखी पैसे मागितल्यावर मुलगा घाबरला, त्यानंतर आईनं महिलेविरोधात तक्रार दाखल केली.

'ब्लॅकमेल' करून उकळले पैसे

तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी महिलेला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली. तत्पूर्वी, महिलेनं अशा 9 जणांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. तिच्या धमकीनं घाबरलेल्यांनी तिला पैसे दिले. मात्र, ब्लॅकमेलिंगला न घाबरणाऱ्यांवर या महिलेनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

एका वर्षात 9 तरुणांना केलं लक्ष्य

या याचिकेला विरोध करत गुरुग्राम पोलिसांनी सहायक पोलिस आयुक्त मनोज कुमार यांच्यामार्फत न्यायालयात अहवाल सादर केला. यामध्ये म्हटलं की, याचिकाकर्त्याला तरुण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध तक्रारी करण्याची सवय होती. सप्टेंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान याचिकाकर्त्यानं 9 जणांविरुध्द एफआयआर दाखल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT