Nashik Crime News esakal
देश

Bengaluru Lynching: 73 वर्षांच्या वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण; लोकांच्या बेदम मारहाणीत मृत्यू

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी कुप्पन्ना विरिोधात पोलिसांत तक्रार दिली. पण...

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरु : अल्पवयीन मुलीच्या लैंगक शोषण प्रकरणी एका ७३ वर्षीय वृद्धाला लोकांनी बेदम मारहाणा केल्याचा प्रकार बंगुरुळू इथं घडला आहे. विशेष म्हणजे या मारहाणातील त्या वृद्धांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री हेन्नूर इथं ही घटना घडली. (Bangaluru 73 year old man sexually assaults minor girl then Death by Lynching)

पोलिसांच्या माहितीनुसार, कुप्पन्ना (वय ७३) असं या मारहाणीत मृत्यू झालेल्या आरोपीचं नाव असून तो बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.

नेमकं घडलं काय?

रविवारी रात्री एक अल्पवयीन मुलगी धुतलेले कपडे वाळवण्यासाठी घराबाहेर पडली पण ती परतली नाही. त्यानंतर काळजीत पडलेल्या तिच्या कुटुंबियांनी शेजाऱ्यांकडे तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, ती कुप्पन्नाच्या घरात बेशुद्धावस्थेत पडलेली त्यांना आढळली. कुप्पन्नानं तिला ज्युसमधून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीला बेदम मारहाण केली.

त्यानंतर सोमवारी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी कुप्पन्ना विरिोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर हेन्नूर पोलीस चौकशीसाठी कुप्पन्नाच्या घऱी पोहोचले तर त्यांना तो मृतावस्थेत आढळला.

हेही वाचा इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

दोन नातेवाईक ताब्यात

याप्रकरणी डीसीपी भीमाशंकर यांनी सांगितलं की, कुप्पन्ना आणि पीडित मुलीचे कुटुंबीय एकमेकांना ओळखत होते. आपला युनिफॉर्म आणण्यासाठी ती कुप्पन्नाच्या घरी गेली होती. पण मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिला शोधण्यासाठी गेलेल्या तिच्या कुटुंबियांनी कुप्पन्नाच्या घरी मुलीला पाहून संतापले आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली, त्याच त्याचा मृत्यू झाला. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी पीडित मुलीच्या दोन नातेवाईकांना ताब्यात घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT