New Delhi Latest Update : भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एकूण ११ बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांच्या बांगलादेशाला लागून असलेल्या सीमेवरून अटक करण्यात आली.
असल्याची माहिती, सीमा सुरक्षा दलाच्यावतीने(बीएसएफ) रविवारी देण्यात आली. यापैकी दोघांना पश्चिम बंगालमधून, दोघांना त्रिपुरामधून तर सात जणांना मेघालयातून अटक करण्यात आल्याचे ‘बीएसएफ’ने सांगितले.
या सर्वांच्या पुढील चौकशीसाठी त्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे बीएसएफच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत बांगलादेशाच्या लष्कराच्या संपर्कात असल्याचेही बीएसएफच्या वतीने सांगण्यात आले.
बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार आणि गुरुवारी असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक रवी गांधी यांनी बांगलादेश सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता.१०) बैठक घेतली. यावेळी बांगलादेशाच्या लष्कराबरोबर पूर्वीप्रमाणेच संबंध ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.