पुढील आठवड्यात म्हणजेच 10 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान देशातील विविध भागातील बँका साधारणपणे 4 दिवस सुट्टी (Holiday) राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) निर्देशानुसार देशभरातील विविध ठिकाणच्या बँकाना पुढील आठवड्यात 4 दिवस सुट्ट्या (Bank remain closed) असतील. परंतु देशातील सर्वच बँका या दिवशी बंद नसतील. विविध ठिकाणांवरील स्थानिक सणांमुळे ठराविक ठिकाणच्या काही भागातील बँकांना सुट्टी असेल. महाराष्ट्रातील बँकाही पुढील आठवड्यात काही दिवस बंद राहणार आहेत.
11 जानेवारी : मिशीनरी डे (मिझोराम)
12 जानेवारी : स्वामी विवेकानंद जयंती (प.बंगालसह काही ठिकाणी)
14 जानेवारी : मकरसंक्रांती/ पोंगल (महाराष्ट्रासह काही राज्यात)
16 जानेवारी : रविवार साप्ताहिक सुट्टी (देशातील सर्व बँका बंद)
दरम्यान यापैकी 14 जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त (Makarsankranti) आणि 16 जानेवारीला (Sunday) रविवार असल्याने या दोन दिवशी महाराष्ट्रातील बँका बंद राहतील. त्यामुळे तुमची आर्थिक कामे उरकून घ्या.
जानेवारी 2022 मध्ये एकूण १४ दिवस सुट्ट्यापैकी (Bank Holidays in January) ४ सुट्ट्या रविवारी (Sunday) आहे. यापैकी काही सुट्ट्या लागोपाठ येणार आहे. १४ दिवस संपूर्ण देशामध्ये बँक बंद असणार नाही. RBIने ऑफिशिअल वेबसाईटवर दिलेल्या सुट्टयांची यादीनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. या सर्व सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागू केल्या असून सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाही. तसेच RBI गाईडलाईन्स नुसार रविवार सोडून महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.