Bartan Banks esakal
देश

Bartan Banks : अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेली भांड्यांची बॅंक नक्की आहे तरी काय? पर्यावरणासाठी की कशी महत्त्वाची आहे?

सकाळ डिजिटल टीम

Bartan Banks :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केले. संसदेच्या आजच्या दिवशी अर्थमंत्री सीतारामन यांनी अनेक गोष्टी स्वस्त आणि अनेक गोष्टी महाग झाल्याचे सांगितले. तसेच यंदाचे बजेट हे सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून बनवले गेल्याचे त्या म्हणाल्या.

अधिवेशनाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला होता. सर्व्हे मध्ये त्यांनी तेलंगणामधील एका बर्तन बँक म्हणजे भांड्यांच्या बँकेचा उल्लेख केला होता. हे नक्की प्रकरण काय आहे, ही कसली बँक आहे, ती कोण चालवते आणि त्याची खासियत काय आहे याबद्दल जाणून घेऊ. (What is bartan bank)

इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये वेगवेगळ्या सेक्टरचा कसा विकास झाला आहे, याचा आढावा घेतला जातो. इन्फ्रास्ट्रक्चर श्रेणीमध्ये बर्तन बँक म्हणजे भांड्याच्या बँकेचा उल्लेख केला गेला. ही बँक तेलंगणामधील सिद्दीपेठ जिल्ह्यात आहे. हैदराबाद पासून 100 किलोमीटर अंतरावर सिद्दीपेठ जिल्हा आहे.

काय आहे भांड्यांची बँक

ही एक युनिक आयडिया आहे, जी आपल्या प्लास्टिक कचऱ्याला नाहीशी करते. म्हणजे सध्या कोणत्याही समारंभात प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर केला जातो. पण ही बँक तुम्हाला भाडेतत्त्वावर स्टीलची भांडी पुरवते. त्यामुळे हिला भांड्यांची बँक असं म्हटलं जातं.

या बँकेच्या अनेक शाखा ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आल्या आहेत. या बँकेत ग्लास, ताट, वाटी, चमचा, जेवणाची भांडी, यांचा समावेश असतो. गावातील सामाजिक धार्मिक किंवा कुठल्याही कार्यक्रमात ही भांडी पुरवली जातात. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कार्यक्रमासाठी अशी भांड्यांची गरज लागणार असेल तर तो प्लास्टिकला नकार देऊन बँकेतून भांडी घेऊ शकतो.

बँकेचा कसा फायदा होतो

या बँकेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी केला जात आहे. प्लास्टिकच्या ताटात जेवल्यामुळे अनेक आजार पसरू शकतात त्यामुळे गावातील लोकांच्या मनात प्लास्टिक कचऱ्याबद्दल जागृती करून या बँकेतील भांडी वापरली जात आहेत.

याचा दुसरा फायदा असा होत आहे की, भांडी भाड्याने दिल्याने ग्रामपंचायतला नफाई होत आहे. भांड्यांच्या भांड्यातून मिळणारे पैसे हे गावा गावातील कामांसाठी आणि ग्रामपंचायतच्या फंडिंग साठी वापरले जात आहेत.

तेलंगणाच्या या बँकेमुळे प्लास्टिकचा कचरा कमी झाला आहे. पूर्वी गावा गावात कार्यक्रमादिवशी प्लास्टिकच्या पत्रावळ्या द्रोण चमचे यांचा खच पडलेला दिसायचा. या ताटामध्ये असलेलं खरकट अन्न कुजून अनेक त्रासही व्हायचा. भांड्यांच्या बँकेमुळे हे प्रकार थांबले आहेत आणि कचरा कमी झाला आहे.

या बँकेत किती भांडे मिळू शकतात

भांड्यांच्या बँकेचा सेटअप उभारण्यासाठी जवळजवळ 1 लाख 75 हजार रुपये इतका खर्च येतो. पाचशे ते हजार लोकांच्या कार्यक्रमासाठी ही भांडी बरोबर पुरतात.

या भांड्यांचे भाडे किती रुपये आहे

ही भांडी पर नग दराने दिली जातात. यामध्ये ताट दोन रुपये, टिफिन प्लेट कृपया, चहाचा ग्लास पन्नास पैसे, पाण्याचा जग दहा रुपये, बादली वीस रुपये असे दर या भांड्यांचे आहेत.

कार्यक्रमाला प्लास्टिकची भांडी वापरणार हा आता सध्याचा ट्रेंड आहे. पण या गोष्टीमुळे पर्यावरणाचे किती नुकसान होत आहे हे तुम्ही पाहत आहात. परत तेलंगाना मधील काही महिलांनी तोडगा शोधून काढला आहे. कार्यक्रमात वापरले जाणारे प्लास्टिकचे पत्रावळ्या यांना फाटा देत या महिलांनी स्टीलच्या भांड्यांची बँक सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत अजितदादा 'एम' कार्ड खेळणार; चार उमेदवारांची नावेही समोर

Seema Deo: सुनेसोबत अशा वागायच्या सीमा देव; सासूबाईंबद्दल बोलताना स्मिता देव म्हणाल्या- त्या घरी असल्या की..

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिल्याने जेष्ठ नागरिकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT