rahul gandhi sakal
देश

मॉब लिंचिंगवरून राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले २०१४ पूर्वी...

पंजाबमध्ये मॉब लिंचिंगमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

सुधीर काकडे

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मॉब लिंचिंग (Mob Lynching) प्रकरणावरून केंद्र सरकरावर टीका केली आहे. पंजाब आणि इतर काही ठिकाणी नुकत्याच झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना राहुल गांधी यांनी '2014 मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं सरकार स्थापन होण्यापूर्वी 'लिंचिंग' हा शब्द ऐकू सुद्धा येत नव्हता असं वक्तव्य केलं आहे.

'धन्यवाद मोदी जी' या हॅशटॅगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांनी हे ट्विट केलं आहे. 2014 पूर्वी 'लिंचिंग' हा शब्दही ऐकला नव्हता असं म्हणत राहुल गांधी यांनी या मुद्यावर लक्ष वेधलं.

पंजाबमधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणानंतर कपूरथाळा येथील निजामपूर गावात एका गुरुद्वारामध्ये शीख धर्माच्या 'निशान साहिब' (ध्वजाचा) अवमान केल्याच्या आरोपात आणखी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : विकासकामे न करणाऱ्यांकडूनच टीका : शंभूराज देसाई; सुपने येथे प्रचार सभा, टीका न करता कामे करत राहण्याचा निर्वाळा

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

The Sabarmati Report : 12th Fail फेम विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची जादू पडली फिकी ; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

SCROLL FOR NEXT