एखाद्या व्यक्तीसाठी दोनदा पंतप्रधान होणे पुरेसे आहे. परंतु, मी दुसऱ्या धातूचा बनलेला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) कोणत्या विरोधी पक्षाच्या नेत्याची आठवण करून देताना म्हणाले. गुजरात सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संबोधित करताना मोदी म्हणाले की, ते शांत बसणार नाहीत. (Narendra Modi said Being prime minister twice is not enough)
एक दिवस एक मोठे नेते मला भेटले. राजकारणात त्यांनी अनेकदा आमचा विरोध केला. परंतु, मी त्यांचा आदर करतो. काही बाबतीत ते माझ्यावर खूश नव्हते. म्हणूनच ते मला भेटायला आले होते. ‘मोदीजी, तुम्ही दोनदा देशाचे पंतप्रधान झाला आहात. आता अजून काय हवंय? कोणी दोनदा पंतप्रधान झाले तर सर्व काही मिळाले, असे त्यांचे मत होते.’, असे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.
मी कोणत्या धातूपासून बनला आहो हे त्यांना माहीत नाही. गुजरातच्या भूमीने मला घडवले आहे. मला वाटत नाही की जे व्हायचे होते ते झाले आहे. म्हणून मी विश्रांती घ्यावी. लोकहिताच्या योजना १०० टक्के लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हे माझे स्वप्न आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्यांना भेटायला आले होते आणि त्यांनीही केंद्राच्या एजन्सीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. शिवसेना नेते संजय राऊत आणि कुटुंबीयांवरील कारवाईबाबतही त्यांनी चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.