Bellary Lok Sabha Election 1999 Story  esakal
देश

Karnataka Election : सोनिया गांधींचा पराभव करण्यासाठी सुषमा स्वराज शिकल्या 'कन्नड'; जाणून घ्या काय आहे 'किस्सा'

कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे.

Balkrishna Madhale

बेल्लारी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, येथील राजकीय इतिहासात अनेक चढउतारही पाहायला मिळाले आहेत.

Karnataka Election 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. मात्र, असं असताना बेल्लारीमधील (Bellary) 1999 चा किस्सा आठवल्याशिवाय कर्नाटकातील निवडणूकच पूर्ण होत नाही.

1999 मध्ये बेल्लारीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) या दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाकयुद्ध झालं. वास्तविक, हे युद्ध काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांच्यात झालं होतं.

आठवड्यात सुषमा स्वराज यांनी शिकली 'कन्नड भाषा'

1999 मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत होत्या. यावेळी भाजपनं सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत सुषमा स्वराज यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

सोनिया गांधींचा पराभव करण्यासाठी सुषमा स्वराज यांनी अवघ्या आठवडाभरात कन्नड भाषा शिकून घेतली होती. एकीकडं त्यांनी कन्नड शिकून सर्वांना आश्चर्यचकित केलं, तर दुसरीकडं स्वराज यांनी येथील स्थानिक लोकांची मनंही जिंकली.

बेल्लारी काँग्रेसचा बालेकिल्ला

सुषमा स्वराज यांना येथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या, असं बोललं जात. त्यासाठी त्यांनी कन्नड शिकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी ही भाषा आठवडाभरात शिकून घेतली आणि भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंतही पोहोचवली. बेल्लारी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, येथील राजकीय इतिहासात अनेक चढउतारही पाहायला मिळाले आहेत.

दरम्यान, सुषमा स्वराज यांनी निवडणूक रॅलींमध्ये कन्नड भाषेत भाषणं देण्यास सुरुवात केली. रॅलीदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी जेव्हा इथं पोहोचले, तेव्हा सुषमा यांचं 20 मिनिटांचं भाषण ऐकून तेही त्यांचे चाहते झाले. रॅलीत त्यांनी सुषमांचं कौतुकही केलं होतं.

'स्वदेशी विरुद्ध परदेशी' मुद्दा गाजला

सुषमा स्वराज या निवडणुकीत जिंकल्या नसल्या तरी, त्यांच्या पराभवाची चर्चा आहे. कारण, त्यांनी आपल्या मेहनतीनं ही निवडणूक रंजक बनवली होती. सुषमा यांनी सुमारे 18 दिवस इथं प्रचार केला होता आणि या 18 दिवसांत त्यांनी 'स्वदेशी विरुद्ध विदेशी' असा मुद्दा उपस्थित केला होता. सुषमा स्वराज ह्या सभांमध्ये जनतेसमोर 'स्वदेशी बेटी' म्हणत असत, तर सोनिया गांधींसाठी 'परदेशी सून' असा शब्द वापरत असत.

मी भारत मातेसाठी मतं मागत आहे - सुषमा स्वराज

सुषमा त्यांच्या एका निवडणूक रॅलीत म्हणाल्या होत्या, "प्रियांका तिच्या आईसाठी मतं मागत आहे. मात्र, मी भारत मातेसाठी मतं मागत आहे, कृपया भाजपला मत द्या." कर्नाटकातील बेल्लारी एक अशी जागा आहे, जिथं विजय-पराजयामध्ये लाखोंचा फरक असायचा. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर सुषमा स्वराज यांनी लोकांच्या मनावर अशी छाप सोडली की, मतांमध्ये केवळ 56,100 मतांचा फरक दिसून आला.

निवडणूक हरल्यानंतरही सुषमांनी जिंकली मनं

बेल्लारीमधून भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं, तरी देशात भाजपचंच सरकार स्थापन झालं. भाजप आघाडीला एकूण 269 जागा मिळाल्या. वास्तविक 29 जागा जिंकणाऱ्या टीडीपीनं पक्षाला पाठिंबा दिला होता. दुसरीकडं काँग्रेसच्या वाट्याला केवळ 114 जागा आल्या. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली, ती सुषमा स्वराज यांच्या पराभवाची. हरल्यानंतरही सुषमा यांनी सर्वांची मनं जिंकली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT