Women Conned after Marriage:सध्या मॅट्रिमोनियल साईट्समुळे लग्नांमध्ये फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. काही लोक आपण डॉक्टर, इंजिनिएर असल्याचा बनाव करुन फसवणूक केल्याच्या अनेक घटना देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकायला येतात.
मात्र, तरिही काही लोक पूर्ण शहानिशा न करता केवळ तो व्यक्ती बक्कळ पैसेवाला आहे, किंवा अधिकारी आहे, हे पाहून लग्न करुन मोकळे होतात.मात्र, नंतर जेव्हा सत्यता त्यांच्या समोर येते तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते.
अशीच घटना आंध्रप्रदेशच्या मैसूरुमध्ये घडलीये. जिथे एका व्यक्तिने आपण डॉक्टर आणि इंजिनिअर असल्याचा बनाव करुन एक दोन नव्हे तर तब्बल १५ महिलांना चूना लावलाय. या व्यक्तीने १५ महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणूक केलीये. (Latest Marathi news)
बंगळूरमधील बानाशंकरी भागात राहणाऱ्या महेश केबी नायक या व्यक्तीने २०१४ पासून एकूण १५ महिलांशी लग्न केलंय. हे प्रकरण तेव्हा प्रकाशात आले, जेव्हा मैसूरूमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली.
महेशने मॅट्रीमोनिअल साइटचा वापर जाळ्यासारखा केला, ज्यावर त्याने स्वत: डॉक्टर आणि इंजिअर असल्याचा बनाव केला. जास्तीत जास्त महिला जाळ्यात अडकाव्या यासाठी त्याने खोटा दवाखानाही बनवला होता आणि त्यात सहकार्यासाठी नर्सही ठेवली होती. (Latest Marathi news)
मैसूरुमधील एका महिलेने त्याच्या विरुद्ध तक्रार केल्यावर त्याला अटक करण्यात आली. या महिलेशी त्याने २०२३मध्ये आंध्रप्रदेशमध्ये लग्न केलं होतं. महेशने क्लिनिक सुरु करण्यासाठी तिच्याकडे पैसे मागात मारहाण करायला सुरुवात केली. जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा तो त्या दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाला.
पोलिसांनी सांगितले की, महेश ज्या महिलांशी लग्न करायचा त्या उच्च शिक्षित आणि कमावणाऱ्या होत्या. पैश्यांसाठी या महिला त्याच्यावर अवलंबून नव्हत्या. या महिलांनी इज्जत जाऊ नये म्हणून आपली फसवणूक झाली याची जाणीव होऊन सुद्धा त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही.
जर ३५ वर्षीय या व्यक्तीचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असतं, तर त्याच्या जाळ्यात यापेक्षा अधिक महिला अडकल्या असत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.