Bengaluru Rameshwaram Cafe Blast: कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी स्फोट झाला. या स्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या काही वेळापूर्वी पटनमधील सॉफ्टवेअर इंजिनीअर कुमार अलंकृतही तिथे उपस्थित होता. अलंकृत याने कॅफेतील स्फोटाचा पहिला व्हिडिओ शेअर केला होता.
या संपूर्ण घटनेचे वर्णन करताना अलंकृतने सांगितले की, अचानक माझ्या आईचा फोन आल्यावर मी माझी ऑर्डर घेतली होती. मी फूड काउंटरपासून 10-15 मीटर दूर गेलो. काही सेकंदांनंतर मला एक मोठा आवाज ऐकू आला आणि मला आजूबाजूला सर्वत्र धूर दिसला.
या स्फोटाच्या भीषणतेचे वर्णन करताना अलंकृतने सांगितले की, इतके भयानक दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. ते रामेश्वरम कॅफेच्या व्हाईटफिल्ड शाखेत खाण्यासाठी गेला होता. या स्फोटात 9 जण जखमी झाले आहेत. मात्र, या स्फोटात 15 हून अधिक लोक जखमी झाल्याचा दावा अलंकृतने केला आहे. अनेक लोक होपरळले तर काहिंच्या कानातून रक्त येत असल्याचेही त्यांनी पाहिले.
२४ वर्षीय अलंकृत बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो ब्रुकफिल्ड येथे भाड्याच्या घरात राहतो. येथून हाकेच्या अंतरावर रामेश्वरम कॅफे आहे.
'कॅफेमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती'
तो म्हणाला, 'मी एक इडली आणि एक डोसा मागवला होता. इडली संपवून मी डोसा काउंटरच्या मागे गेलो. मी सहसा डोसा पिकअप पॉईंटजवळच्या भागात बसतो. पण आज माझा डोसा झाला तेव्हा मला आईचा फोन आला. कॅफेच्या आत खूप आवाज येत होता म्हणून मी बाहेर आलो. मी आईशी बोलत असताना अचानक मागून मोठा आवाज झाला.
अलंकृत यांनी सांगितले की, लोकांचा मोठा जमाव बाहेर आल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तो म्हणाला, 'एवढा मोठा आवाज मी माझ्या आयुष्यात कधीच ऐकला नाही. किचनमधून खूप धूर येताना दिसला.
तो म्हणाला, 'एका महिलेचे कपडे मागून फाटले. एका व्यक्तीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. दोन 80 वर्षांच्या महिलांना रक्तस्त्राव होत होता आणि लोक त्यांना बँडेज बांधत होते.
रामेश्वर कॅफेचे पाच कर्मचारी जखमी
अलंकृत यांनी सांगितले की, रामेश्वर कॅफेचे किमान पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. एक जण रडत होता. मोठ्या आवाजामुळे अनेकांच्या कानात स्फोटाचा आवाज घुमला. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. लोकांना धक्का बसला होता.
अलंकृत म्हणाला, 'आज मी माझ्या आईमुळेच वाचलो. त्यावेळी जर तिचा फोन आला नसता तर मी ज्या काउंटरजवळ बसलो असतो.
बंगळुरू कॅफेमध्ये स्फोट घडवणाऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. त्याचे वय 28 ते 30 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कॅफेमध्ये आला आणि काउंटरवरून कूपन घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्याने रवा इडली मागवली, पण खाल्ली नाही. ज्या बॅगमध्ये बॉम्ब होता ती ठेवली आणि निघून गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.