देश

...तर पंजाब देशाचा हिस्सा नाही लिहून द्या; भगवंत मान यांचा हल्लाबोल

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरदेखील हल्लाबोल केला.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) त्यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे चर्चेत आहे. दरम्यान, मान यांनी पठानकोटमध्ये (Pathankot Attack) झालेल्या दहशवादी हल्ल्याबाबत बोलताना केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हल्ल्याच्या काही दिवसांनंतर एक पत्र आल्याचे सांगत त्यात सैन्य पाठवल्याबद्दल पंजाबने 7.5 कोटी द्यावे असा उल्लेख असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. (Bhagwant Mann On Pathankot Attack)

मान म्हणाले की, पठाणकोट हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी पठानकोठ येथे सैन्य (India Army) दाखल झाले त्यांनी दहशतवाद्यांशी जोरदार मुकाबलापण केला. मात्र, हल्ल्याच्या घटनेनंतर पंजाब सरकारला एक पत्र आले, त्यात दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सैन्य पाठवल्याबद्दल पंजाबने आम्हाला 7.5 कोटी रुपये द्यावे असा उल्लेख होता. या सर्व प्रकरणावर चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेतली. तसेच ही रक्कम आमच्या MPLAD मधून कापून घेण्यास सांगितले. पण, केंद्राने पंजाबला भाड्याने सैन्य दिल्याचे आणि पंजाब देशाचा भाग नाही, असे लिहून देण्यास सांगितले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरदेखील हल्लाबोल करत पीएम मोदी म्हणतात, सबका साथ सबका विकास पण कुठे आहे साथ? असा प्रश्न उपस्थित करत नाही तुम्हाला साथ द्यायची आहे ना तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे, असे मान यांनी यावेळी सांगितले.

सत्तेत येताच भगवंत मान यांचा मोदींना दणका, केंद्राविरोधात आणला ठराव

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चंदिगडला केंद्रीय नियमांतर्गत ठेवण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात ठराव मांडला आहे. पंजाबात सत्ता येताच आम आदमी पक्षाच्या सरकारने तत्काळ अधिवेशन भरवलं. यामध्ये मुख्यमंत्री मान यांनी केंद्र सरकारला चंदिगड पंजाबला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव देण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

केंद्रशासित प्रदेशातील कर्मचाऱ्यांना सेंट्रल सर्व्हिस कमिशनच्या नियमांअंतर्गत विस्तार करण्यासाठी केंद्राने अधिसूचना जारी केली होती. केंद्राच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी पंजाब विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन सुरू केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

SCROLL FOR NEXT