Bharatiya Janata Party expelled three of its workers after arrested by the Varanasi Police molestation of an IIT BHU student 
देश

IIT-BHU प्रकरणातील तिन्ही आरोपींची भाजपमधून हकालपट्टी! विद्यार्थीनीवर केले होते लैंगिक अत्याचार

IT-BHU मध्ये दोन महिन्यापूर्ण एका विद्यार्थीनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- IIT-BHU मध्ये दोन महिन्यापूर्ण एका विद्यार्थीनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपी भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं होतं. याप्रकरणी भाजपने तिन्ही आरोपींना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.( Bharatiya Janata Party expelled three of its workers after arrested by the Varanasi Police molestation of an IIT BHU student )

तिन्ही आरोपी पक्षामध्ये कोणत्या पदावर होते किंवा विंगमध्ये होते हे भाजपकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. पक्षाकडून इतकंच सांगण्यात आलंय की त्यांना पक्षातून हद्दपार करण्यात आलं आहे. वाराणसी भाजप जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा यांनी सांगितलं की, तिन्ही तरुणांना पक्षातून काढून टाकण्यात आलंय. पुढील कारवाई पक्षाच्या निर्देशानुसार होईल.

तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टामध्ये हजर केलं होतं. कोर्टाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. दोन महिन्यापूर्वी आयआयटी बीएचयू कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. तब्बल ६० दिवसांनी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सर्व आरोपी वाराणसीचे राहणारे असून पोलिसांनी एक बुलेट देखील जप्त केली आहे. गुन्हा करताना हीच बुलेट वापरण्यात आल्याचं सांगितलं जातं. आरोपींचे नाव कुणाल पांडेय, अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल असे आहेत. तिन्ही आरोपी भाजपशी संबंधित असल्याने विरोध पक्षांनी जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे.

पोलिसांच्या कारवाईनंतर उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री रविंद्र जयस्वाल म्हणाले की, आरोपी कोणीही असो त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. आरोपी कुठलेही असो, कुठुनही आले असतील. भाजपमधील असतील तरी दोषी असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, आयआयटी कॅम्पसमध्ये रात्रीच्या वेळेस बुलेटवरुन आलेल्या तीन आरोपींनी मुलीला बंदुकीचा धाक दाखवून तिचे कपडे उतरवायला लावले होते. विद्यार्थीनीचे कपडे काढल्यानंतर आरोपींनी तिचा व्हिडिओ देखील काढला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यांनी कॅम्पसमध्ये निदर्शने केले होते. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT