देश

ममता-टिकैत भेट: कायदे रद्दच व्हावेत; 'ममतां'चं शेतकऱ्यांना समर्थन

विनायक होगाडे

कोलकाता: सुधारित तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी संतप्त आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु असून देखील मोदी सरकारने हे कायदे मागे घेतलेले नाहीयेत. या कायद्यांवरुन आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारच्या दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र तरिही समाधानकारक असा तोडगा निघाला नाहीये. त्यातच कोरोनाची दुसरी लाट आली असताना देखील हे आंदोलन आजही सुरुच आहे. या आंदोलनात आतापर्यंत अनेक आंदोलकांनी आपला जीव गमावला आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आलेली असताना या आंदोलनाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न देखील शेतकरी आंदोलकांकडून केले जात आहेत. (Bharatiya Kisan Union leader Rakesh Tikait meets West Bengal CM Mamata Banerjee on issues related to agriculture and local farmers)

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यामध्ये भेट घेतली. या बैठकीत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी शेती आणि स्थानिक शेतकऱ्यांबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, एकीकडे उद्योगांचे हाल होत असून दुसरीकडे औषधांवर देखील जीएसटी लावला जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी बोलण्याची देखील तसदी घेतली नाहीये. मी अशी मागणी करतेय की हे तीनही कृषी कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत.

यावेळी राकेश टिकैत यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, त्यांचा या शेतकरी आंदोलनाला असलेला पाठिंबा कायम आहे. पश्चिम बंगाल एक मॉडेल स्टेट म्हणून काम करेल आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा करवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल.

शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत, मात्र या आंदोलनात आतापर्यंत 500 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात किसान एकता मोर्चाच्या ट्विटरवर म्हटलंय की, शेतकरी आंदोलनाचे सहा महिने पूर्ण करणं तितकसं सोपं नव्हतं. मोदी सरकारच्या अहंकारी आणि निर्दयी वागणुकीमुळे या आंदोलनात आतापर्यंत 500 हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे आंदोलक शेतकरी आपला होऊपर्यंत ठामपणे उभे राहितील. #500DeathsAtFarmersProtest अशा आशयाचे ट्विट किसान एकता मोर्चाच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे. याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. राहुल गांधी यांनी वेळोवेळी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढून सरकारविरोधातील शेतकऱ्यांच्या या मागणीला कृतीशील पाठिंबा दाखवला आहे. ते सातत्याने शेतकऱ्यांची बाजू मांडत असतात. याच संदर्भात आता राहुल गांधी यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, शेती आणि देशाच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी सातत्याने आपले प्राण गमावले आहेत. मात्र, शेतकरी घाबरले नाहीयेत. ते आजही तितक्याच ठामपणे खरेपणाने उभे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT