लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022)पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच सर्व विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकवटले आहेत. शुक्रवारी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav)यांच्यासोबत झालेल्या दुसऱ्या बैठकीनंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर ( Bhim Army Chandrashekhar Azad) यांनी मोठी घोषणा करत या विधानसभा निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षासोबत (BSP)युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीनंतर आता भाजपचा पराभव अटळ आहे. लवकरच अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा करुन जागा जागा निश्चित करु असे ही ते म्हणाले. त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य आणि धरमसिंह सैनी यांच्या सहा आमदारांसह अखिलेश यादव यांची भेट घेतली.
अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर म्हणाले की, एकजूटीत मोठी ताकद असते. ताकद आणि एकजुटीशिवाय भाजप आणि बसपाला पराभूत करणे सोपे नाही. सर्व समाजातील लोकांचे प्रतिनिधित्व आणि सन्मान राखण्याची जबाबदारी युतीच्या नेत्यांची आहे. ही जबाबदारी अखिलेश यादव यांनी पार पाडावी अशी दलित वर्गाची अपेक्षा आहे.
युवा नेता म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर यांची पश्चिम उत्तर प्रदेशातील दलित वर्गात मोठी पकड आहे. लखनऊ ते मेरठ आणि सहारनपूरमध्ये ते खूप सक्रिय आहेत. शिवाय ते काँग्रेसच्याही संपर्कात होते. यानंतर त्यांची समाजवादी पक्षाशी युती झाल्याची चर्चा बराच काळ सुरू होती. समाजवादी पक्षासोबत युती करताना मागासवर्गीयांचा एक मोठा चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. पण दलित वर्गातील मोठ्या चेहऱ्यांची उणीव चंद्रशेखर यांच्या पक्षाच्या आघाडीने भरून काढली आहे. चंद्रशेखर यांची पक्षासोबत युती करणे म्हणजे मोठ कटकारस्थान असणार असे बसपाचा म्हणणे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.