नवी दिल्ली : ज्ञानवापीनंतर आता मध्य प्रदेशातील भोजशाळाचंही पुरातत्व विभागातर्फे सर्व्हेक्षण होणार आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाच्या इंदौर खंडपीठानं आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला (ASI) आदेश दिले आहेत. याबाबत हिंदू फ्रन्ट फॉर जस्टिसच्यावतीनं हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टानं हे निर्देश दिले आहेत. (Bhojshala ASI survey will be conducted in Madhya Pradesh after Gyanvapi)
याचिकेत काय म्हटलं होतं?
मुस्लिमांना भोजशाळात नमाज पठणापासून रोखलं जावं तसेच हिंदूंना नियमित पुजेचा अधिकार दिला जावा, अशी मागणी हिंदू फ्रन्टच्यावतीनं याचिकेत करण्यात आली होती. याप्रकरणी सोमवारी वरिष्ठ वकिल विष्णू शंकर जैन यांनी ट्विट करुन माहिती दिली. यात त्यांनी म्हटलं की, इंदौर खंडपीठानं त्यांच्या अपिलावर एएसआय सर्व्हेला परवानगी दिली आहे. (Marathi Tajya Batmya)
धार जिल्ह्याच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, राजा भोज (इस १०००-१०५५) परमार राजघराण्याचे मोठे शासक होते. त्यांनी धार इथं विद्यापीठाची स्थापना केली होती. या विद्यापीठाला नंतर भोजशाळा या नावानं ओळखलं जाऊ लागलं. या विद्यापीठाला मुस्लिम शासकानं मशिदीत रुपांतरीत केलं, असा दावा केला जातो. (Latest Marathi News)
इंदौर खंडपीठानं काय म्हटलं?
हायकोर्टाच्या इंदौर खंडपीठानं या याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं की, एएसआयला भोजशाळाच्या ५० मीटर क्षेत्राचा वैज्ञानिक सर्व्हेक्षण केलं पाहिजे. कोर्टाच्या निर्देशांनुसार, पुरातत्व विभागाचे ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम सर्व्हे करणार आहे. त्यानंतर ६ आठवड्यांनंतर या सर्व्हेचा अहवाल कोर्टात जमा करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.