केजरीवाल सरकारनं हरिजन शब्दाऐवजी 'डॉ. आंबेडकर' वापरण्याचा निर्णय घेतलाय.
दिल्लीच्या अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारनं हरिजन (Harijan) शब्दाऐवजी 'डॉ. आंबेडकर' (Dr. Ambedkar) वापरण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आलीय. हरिजन बस्ती/मोहल्लाला आतापासून डॉ. आंबेडकर बस्ती/मोहल्ला म्हटलं जाणार आहे. यापूर्वी आम आदमी पक्षाच्या सरकारनं दिल्लीतील सर्व कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि भगतसिंग (Bhagat Singh) यांची छायाचित्रं लावण्याचे आदेश दिले होते.
एका अंदाजानुसार, दिल्लीत दलित लोकसंख्या सुमारे 16.75 टक्के आहे. केजरीवाल सरकारच्या या निर्णयाला आगामी महापालिका निवडणुकीशीही (Delhi Municipal Election) जोडलं जात आहे. याशिवाय, पंजाबमधील दलितांच्या मोठ्या वर्गाचाही पक्षाला पाठिंबा मिळालाय.
राजकीय जाणकारांच्या मते, केजरीवाल सरकारचा (Kejriwal Government) हा निर्णय त्या रणनीतीचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत अरविंद केजरीवाल दलित मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्ष आता देशाच्या इतर भागात विस्तार करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
आजकाल जेव्हा-जेव्हा अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर येतात, तेव्हा त्यांच्या मागं भगतसिंग एका बाजूला आणि डॉ. आंबेडकर दिसतात. आप या दोन महापुरुषांच्या आदर्शांवर चालणारा पक्ष, असं त्यांचं वर्णन आहे. काही राजकीय तज्ज्ञ आणि विरोधी पक्षनेते असंही म्हणतात की, 'आजकाल अरविंद केजरीवाल यांचे फक्त निळ्या शर्टमध्ये दिसणं हा देखील याच रणनीतीचा भाग आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.