Earthquake Sakal
देश

Earthquake : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी राजधानी दिल्लीसह उत्तर भारत हादरला

या भूकंपाचा केंद्रबिदू असलेल्या नेपाळमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात काल रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दोन वेळा हे धक्के जाणवल्याने अनेक जण आपल्या घरातून बाहेर आले. रात्री २ च्या सुमारास हे धक्के जाणवले असून या भूकंपाचं केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या मणिपूर इथं जमिनीपासून १० किलोमीटर खोल असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर भारतात पाच तासांमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. या आधी मंगळवारी रात्री आठ वाजून ५२ मिनिटांनी लखनौसहित उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल असल्याचं सांगितलं जात आहे.

नेपाळमध्ये तर २४ तासांमधला हा तिसरा मोठा भूकंपाचा धक्का आहे. हा भूकंप उत्तर प्रदेशातल्या लखनौ, मुरादाबाद, मेरठ, बरेली अशा शहरांमध्ये जाणवले. तर एनसीआर परिसरातल्या फरीदाबाद, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा या भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पण अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना झाल्याचं समोर आलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT