Nitish Kumar Tejashwi Yadav esakal
देश

महागठबंधन सरकार विधानसभेत आज बहुमत सिद्ध करणार; तेजस्वी यादवांनी जारी केला 'व्हीप'

बिहारसाठी राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा मानला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

बिहारसाठी राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा मानला जात आहे.

Bihar Politics : बिहारसाठी राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा मानला जात आहे. आज 24 ऑगस्टपासून विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकार (Mahagathbandhan Government) सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. तर, दुसरीकडं विधानसभा अध्यक्षांवरून सतत रस्सीखेच सुरू आहे.

सभापती विजय सिन्हा (Vijay Sinha) आपलं पद सोडतात की नाही याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. पदावरून दूर न झाल्यास सत्ताधारी पक्ष त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतो. या सगळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि आरजेडी विधीमंडळ पक्षाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केलाय. सर्व आमदारांना सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.

बिहार विधानसभेचं एकूण संख्याबळ 243 आमदार असलं, तरी सध्या केवळ 241 सदस्य आहेत. विधानसभेच्या 2 जागा रिक्त आहेत. दरम्यान, असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या AIMIM च्या एकमेव आमदारानं विश्वासदर्शक ठरावादरम्यान महागठबंधन सरकारच्या बाजूनं मतदान केल्याचं सांगितलंय. अशाप्रकारे सभागृहात एकूण 165 आमदार महागठबंधनच्या बाजूनं असतील. यापूर्वी महागठबंधनात सहभागी सर्व पक्षांच्या आमदारांसह एक अपक्ष असे 164 आमदार होते. अपक्ष सुमितकुमार सिंह यांनी सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. बिहार विधानसभेतील आमदारांची सध्याची संख्या पाहता सध्या बहुमतासाठी 121 आमदारांची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT