जातीय जनगणनेचा अहवाल आज बिहार विधानसभेत मांडला जाणार आहे. या अहवालावर सभागृहात चर्चा होणार आहे. हा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच जातीय जनगणनेची आर्थिक आणि शैक्षणिक आकडेवारी समोर आली आहे. यानुसार बिहारमध्ये केवळ ७ टक्के लोक पदवीधर आहेत. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर राज्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील २५.९ टक्के कुटुंबे गरीब आहेत. सवर्णांमध्ये सर्वांत गरीब भूमिहार आणि ब्राह्मण कुटुंबे आहेत.
नितीश कुमार सरकारने बिहारमध्ये जातीय जनगणना केली होती. त्याची आकडेवारी यावर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आली होती. आता ते विधानसभेत मांडले जात आहे. यासोबतच जातीय जनगणनेची आर्थिक आणि शैक्षणिक आकडेवारीही जाहीर केली जात आहे.
बिहारमध्ये २२.६७ टक्के लोकसंख्येने पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
- इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १४.३३ टक्के लोकांनी शिक्षण घेतले आहे.
- तर नववी ते दहावीपर्यंत १४.७१ टक्के लोकांचे शिक्षण झाले आहे.
- ९.१९ टक्के लोकसंख्या अकरावी ते बारावीपर्यंत शिकली आहे.
- बिहारमध्ये पदवीधर असलेल्या नागरिकांची संख्या केवळ ७ टक्के आहे.
- सर्वसाधारण प्रवर्गातील २५.९ टक्के कुटुंबे गरीब आहेत.
- ३३.१६ टक्के मागासवर्गीय कुटुंबे गरीब आहेत.
अतिमागासप्रवर्गातील ३३.५८ टक्के गरीब कुटुंबे आहेत.
अनुसूचित जातीत ४२.९३ टक्के गरीब कुटुंबे आहेत.
अनुसूचित जमातीत ४२.७० टक्के गरीब कुटुंबे आहेत.
इतर जातींमध्ये २३.७२ टक्के गरीब कुटुंबे आहेत.
कोणत्या जातीची किती कुटुंबे गरीब आहेत?
२५.३२ टक्के भूमिहार कुटुंबे आहेत.
२४.८९ टक्के राजपूत कुटुंबे गरीब आहेत.
- १३.८३ टक्के कायस्थ कुटुंबे गरीब आहेत.
पठाण (खान) २२.२० टक्के कुटुंबे गरीब आहेत.
- १७.६१ टक्के सय्यद कुटुंबे गरीब आहेत.
सर्वसाधारण प्रवर्गातील सुमारे २५ टक्के लोकांचे मासिक उत्पन्न ६ हजार रुपयांपर्यंत आहे. २३ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ६ ते १० हजार आहे. १९ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न १० हजार ते २० हजार आहे. १६ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न २० हजार ते ५० हजारांपर्यंत आहे. ९ टक्के लोकांचे मासिक उत्पन ५० हजारांहून जास्त आहे.
मागासवर्गीयांमध्ये ३३ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ६ हजारांपर्यंत आहे. २९ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ६ ते १० हजार आहे. १८ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न १० ते २० हजार आहे. मागासप्रवर्गातील १० टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न २० ते ५० हजार आहे.४ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ५० हजारांपेक्षा जास्त आहे.
अतिमागासप्रवर्गातील ३३ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ६ पर्यंत आहे. ३२ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ६ ते १० हजार आहे. १८ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न १० ते २० हजार आहे. दोन टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ५० हजारांहून अधिक आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील ४२ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ६ पर्यंत आहे. २९ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ६ ते १० हजार आहे. १५ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न १० ते २० हजार आहे. ५ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न २० ते ५० हजार आहे. एक टक्का लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ५० हजारांहून अधिक आहे.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील ४२ टक्के लोकांचे मासिक उत्पन्न ६ पर्यंत आहे. २५ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ६ ते १० हजार आहे. १६ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न १० ते २० हजार आहे. ८ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न २० ते ५० हजार आहे. तर २.५३ टक्के लोकसंख्येचे मासिक उत्पन्न ५० हजार आहे.
#बिहार सर्वसाधारण प्रवर्गात ६ लाख ४१ हजार २८१ नोकऱ्या आहेत.
जात सरकारी नोकऱ्या टक्के
भूमिहार १८७२५६ ४.९ टक्के
ब्राम्हण १७२२५९ ३.६ टक्के
राजपूत १७१९३३ ३.८१ टक्के
कायस्थ ५२४९० ६.६८ टक्के
शेख ३९५९५ ०.७ टक्के
पठाण १०५१७ १.०७ टक्के
सैय्यद ७२३१ २.४२ टक्के
जात नोकऱ्या टक्के
यादव 289538 २८९५३८ १.५५ टक्के
कुशवाह ११२१०६ २.०४ टक्के
कुर्मी ११७१७१ ३.११ टक्के
बनिया ५९२८६ १.९६ टक्के
सुरजापुरी मुस्लीम १५३५९ ०.६३ टक्के
भांट ५११४ ४.२१ टक्के
मलिक मुस्लिम १५५२ १.३९ टक्के
जाती सरकारी नोकऱ्या टक्के
तेली ५३०५६ १.४४ टक्के
मल्लाह १४१०० ०.४१ टक्के
कानू ३४४०४ १.१९ टक्के
धानुक ३३३३७ १.१९ टक्के
नोनिया १४२२६ ०.५७ टक्के
चंद्रवंशी ३१२०० १.४५ टक्के
न्हावी २८७५६ १.३८ टक्के
बढ़ई २०२७९ १.०७ टक्के
हलवाई ९५७४ १.२ टक्के
जाती सरकारी नोकऱ्या टक्केवारी
दुसाध ९९२३० १.४४ टक्के
चमार ८२२९० १.२० टक्के
मुसहर १०६१५ ०.२६ टक्के
पासी २५७५४ २ टक्के
धोबी ३४३७२ ३.१४ टक्के
डोम ३२७४ १.२४ टक्के
जाती सरकारी नोकऱ्या टक्के
संथाल ५५१९ ०.९६ टक्के
गोंड ८४०१ १.५९ टक्के
उरांव २१२० १.०६ टक्के
थारू ३१२८ १.६३ टक्के
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.