Chief Minister Nitish Kumar statemnet Not going to Modi meetings is no different bihar bjp politics sakal
देश

Bihar Caste Census: बिहार सरकारनं जाहीर केली जातनिहाय जनगणनेची आकडेवारी; जाणून घ्या डिटेल्स

या जनगणेतून बिहारमधील विविध समाजाच्या लोकसंख्येबाबत अनेक महत्वाच्या बाबी स्पष्ट झाल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : बिहारमधील नितीश कुमार सरकारनं जातनिहाय जनगणनेची आकडेवारी अखेर जाहीर केली आहे. अशा प्रकारे देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यानं जातनिहाय जनगणना केली आहे.

गांधी जयंतीचं औचित्य साधत बिहारचे मुख्य सचिव आमिर सुबहानी यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. या जनगणेतून बिहारमधील विविध समाजाच्या लोकसंख्येबाबत अनेक महत्वाच्या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. (Bihar caste survey released OBCs EBCs together account for 63 perc of total population )

हिंदूंची एकूण लोकसंख्या किती?

बिहारनं केलेल्या जातनिहाय जनगणनेत हिंदूंची एकूण संख्या ८१.९९ टक्के म्हणजेच सुमारे ८२ टक्के आहे. तर मुस्लिमांची संख्या १७.७ टक्के आहे. इतरांमध्ये ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मियांची लोकसंख्या १ टक्क्याहून कमी आहे. तर राज्यातील २,१४६ लोक निधर्मी आहेत. (Latest Marathi News)

कोणत्या वर्गाची लोकसंख्या किती?

  1. सर्वसाधारण वर्ग - १५.२२ टक्के

  2. मागास वर्ग - २७.१२ टक्के

  3. ओबीसी - ३६.१ टक्के

  4. अनुसुचीत जाती - १९.६५ टक्के

  5. अनुसुचीत जमाती - १.६८ टक्के

कोणत्या समाजाची लोकसंख्या किती?

  1. ब्राह्मण - ३.६७ टक्के

  2. राजपूत - ३.४५ टक्के

  3. भूमिहार - २.८९ टक्के

  4. कायस्थ - ०.६० टक्के

  5. यादव - १४.२६ टक्के

  6. कुरमी - २.८७ टक्के

  7. तेली - २.८१ टक्के

  8. मुसहर - ३.०८ टक्के

  9. सोनार - ०.६८ टक्के

भाजपसोबत सत्तेत असताना प्रस्ताव पारित

बिहारमध्ये नितीश कुमार हे भाजपसोबत सत्तेत असतानाच राज्यात जातनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर झाला होता. कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर १ जून २०२२ रोजी सर्वपक्षीय बैठकीत सर्वसंमतीनं जातनिहाय जनगणना करण्याचं मान्य करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT