INDIA bloc 
देश

INDIA bloc: नितीश कुमार यांनी उगाच नाही नाकारलं 'इंडिया'चं संयोजक पद! रणनीतीचा आहे भाग

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापली आहे. इंडिया आघाडीची नुकतीच एक व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयोजक बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, संयोजक पद स्वीकारण्यास नितीश कुमार यांनी नकार दिलाय.

नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. संयोजक पदासाठी ते इच्छूक असल्याचं बोललं जात होतं. काही पक्षांकडून त्यांना विरोध होण्याची शक्यता होती. मात्र, तरी त्यांच्या नावाच्या प्रस्ताव समोर ठेवण्यात आला होता. त्यामुळे ते संयोजक पद स्वीकारतील अशी दाट शक्यता होती. मात्र, तुर्तास त्यांनी स्वत:ला वेगळे ठेवले आहे. त्यांच्या या निर्णयामागे रणनीती असल्याचं बोललं जात आहे. (Bihar CM Nitish Kumar rejects post of convenor of INDIA bloc know reason)

इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपावरुन अद्याप निर्णय झालेला नाही. जेडीयूचे वरिष्ठ नेता आणि अर्थमंत्री विजय कुमार चौधरी यांनी सांगितलं की, जशा गोष्टी व्हायला पाहिजे होत्या तशा होत नाहीयेत. जागावाटप झालेले नाही. भाजपला टक्कर देण्याची योजना बनवण्यात आली नाही. तसेच, नितीश कुमार यांनी जागावाटपाआधी संयोजकपद स्वीकारलं असतं तर बिहारमध्ये वाटाघाटीची शक्ती कमी झाली असती.

बिहारमध्ये सहा पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. जदयू, काँग्रेस आणि सीपीआय-एमएल यांच्यामध्ये जागा वाटपाची गाडी अद्याप अडकली आहे. लालूंच्या आरजेडी पक्षाने १७ जागांची मागणी केली आहे. नितीश कुमारांची संयोजकपद स्वीकारलं असतं तर लालू यांची मागणी मान्य करण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढला असता. महत्व नसलेल्या पदाला स्वीकारुन नितीश कुमार आपली वाटाघाटीची शक्ती कमी करुन घेणार नाहीत.

तज्त्रांच्या दाव्यानुसार, नितीश कुमार हे केंद्रात जावेत अशी लालू यादव यांची इच्छा आहे. कारण त्यामुळे राज्यात तेजस्वी यादव यांच्यासाठी जागा होईल. नितीश कुमार हे मुरलेले राजकारणी आहेत. बिहारमध्ये भाजपसोबत असताना देखील त्यांनी स्वत:लाच फोकसमध्ये ठेवलं. भाजपला स्वत:पेक्षा मोठं होऊ दिलं नाही. केंद्रातही ते महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या क्षमतेचे आहेत. पण, राज्यातील राजकारणाचा बळी देऊन ते केंद्रात जाण्यास कितपत तयार होतील हा प्रश्न आहे. दुसरीकडे, जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर ते संयोजकपद स्वीकारण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT