Sushil Kumar Modi Cancer: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहून सर्वांना धक्का दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आपण कॅन्सरसारख्या घातक आजाराने ग्रस्त असून, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी लिहिले आहे.
सुशील कुमार मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. सुशील मोदी म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना सांगितले आहे.
गेल्या ६ महिन्यांपासून मी कॅन्सरशी झुंज देत आहे. आता सर्वांना सांगण्याची वेळ आली आहे, असे मला वाटले. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. मी पंतप्रधान मोदींना सांगितले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देश, बिहार आणि पक्ष यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, अशी पोस्ट त्यांनी सोशल मिडीयावर केली आहे.
सुशील मोदी हे बिहारच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. बिहार राज्यातील भाजपचे मोठे नेते मानले जातात. ते 2005 ते 2013 पर्यंत सतत बिहार सरकारचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राहिले आहेत. त्यानंतर जेव्हा नितीश कुमार एनडीएमध्ये परतले तेव्हा ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.