Nitish Kumar Cabinet Expansion esakal
देश

Nitish Kumar Cabinet : जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसच्या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा संपूर्ण यादी

नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nitish Kumar Cabinet Expansion : नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. जेडीयू, आरजेडी, काँग्रेस (Congress) आणि हिंदुस्थान अवाम मोर्चाचे (एचयूएम) 30 हून अधिक आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीयत.

आरजेडीकडून 16 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतील. जेडीयूचे 11 आमदार तर काँग्रेसचे दोन, हिंदुस्थान अवामचा एक आणि एक अपक्ष आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान सर्व नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलीय. विभागांचे विभाजनही आज होण्याची शक्यता आहे.

सर्वप्रथम विजय चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, तेज प्रताप यादव, अफाक आलम आणि आलोक मेहता यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल चौहान यांनी पाच जणांना एकत्र पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीच्या दुसऱ्या फेरीत अशोक चौधरी, जेडीयूचे श्रवण कुमार, आरजेडीचे रामानंद यादव, सुरेंद्र कुमार यादव आणि लेशी सिंह यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. श्रवण कुमार हे नितीश कुमार यांच्या कुर्मी जातीतील आहेत. त्याच वेळी अशोक चौधरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले आहेत आणि नंतर ते जेडीयूमध्ये दाखल झाले.

आरजेडीच्या वतीनं पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई वीरेंद्र यांचा शेटवच्या क्षणी मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या जागी रामानंद यादव यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय. शपथविधीच्या तिसऱ्या फेरीत माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन, मदन कुमार सैनी, ललित यादव, सर्वजीत कुमार आणि संजय झा यांनी शपथ घेतली.

शपथविधीच्या चौथ्या फेरीत ज्येष्ठ राजद नेते समीर महासेठ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत जेडीयू नेत्या शीला मंडल यांनाही राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली, त्या एनडीए सरकारमध्ये मंत्रीही होत्या. त्यांच्यासोबत माजी आयपीएस सुनील कुमार, चंद्रशेखर आणि अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनी शपथ घेतलीय.

याशिवाय, इस्त्रायल मन्सूरी, आमदार सुरेंद्र राम, आरजेडीचे कार्तिक सिंह, एआयएमआयएम सोडून आरजेडीमध्ये प्रवेश केलेले शाहनवाज आलम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच आरजेडी नेत्या आणि राबडी देवींच्या जवळच्या सहकारी अनिता देवी यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतलीय. त्यांच्यासोबत जेडीयूचे आमदार जामा खान, आरजेडी नेते जितेंद्र राय, जगदानंद सिंग यांचा मुलगा सुधाकर सिंग आणि जयंत राज यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT