Awadh Bihari Chaudhary esakal
देश

महागठबंधन सरकार स्थापन होताच सभापतीही बदलणार; लालूंच्या मित्राची निवड निश्चित!

विजय कुमार सिन्हांच्या राजीनाम्यानंतर सध्या उपसभापती महेश्वर हजारी हे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

सकाळ डिजिटल टीम

विजय कुमार सिन्हांच्या राजीनाम्यानंतर सध्या उपसभापती महेश्वर हजारी हे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

Bihar Assembly Special Session : बिहारमध्ये नितीश कुमार सरकारनं (Nitish Kumar Government) विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या काळात स्पीकर (सभापती) असलेले विजय कुमार सिन्हा (Vijay Kumar Sinha) यांनी त्यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी राजीनामा दिला होता. आता विधानसभा अध्यक्ष निवडण्याची वेळी आलीय.

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अवध बिहारी चौधरी (Awadh Bihari Chaudhary) यांनी आज सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) उपस्थित होते. अवध बिहारी चौधरी हे सिवानमधून राजदचे आमदार आहेत. ते आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे मानले जातात. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.

महागठबंधन सरकारच्या विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावण्यात आलेलं विधिमंडळ पक्षाचं विशेष अधिवेशन एक दिवसासाठी वाढविण्यात आलंय. आता हे कामकाज 26 ऑगस्टपर्यंत चालणार असून त्याच दिवशी गरज भासल्यास नवीन सभापतीपदासाठी मतदान होणार आहे. विजय कुमार सिन्हा यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे. आरजेडीनं या पदासाठी आपले ज्येष्ठ नेते अवध बिहारी चौधरी यांचं नाव पुढं केलं आहे. त्यांनी आज या पदासाठी अर्ज दाखल केला. नामांकनाच्या वेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह महागठबंधनचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, विजय कुमार सिन्हा यांच्या राजीनाम्यानंतर सध्या उपसभापती महेश्वर हजारी हे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT