Bihar Vidhansabha sakal
देश

Bihar Vidhansabha : बिहार विधानसभेत प्रचंड गदारोळ;कामकाज दोनदा तहकूब,विशेष दर्जा नाकारल्याने विरोधक संतप्त

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार दिल्यावरून बिहार विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. संतप्त विरोधकांनी हौद्यात उतरत जोरात घोषणाबाजी केली. त्यांनी टेबल उलटून टाकण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

राजद, काँग्रेस व डाव्या पक्षांचे विरोधी आमदार ‘बिहारविरोधी भाजपची लाज वाटते,’ असे लिहिलेले फलक हाती घेत सभागृहात पोचले. त्यापैकी काहीजणांच्या हातात लहान मुलांचा खुळखुळाही होता. बिहारला विशेष राज्याचा दर्जा व इतर मदत नाकारून केंद्राने राज्याच्या हाती ‘खुळखुळा’ दिल्याचे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. काँग्रेसचे शकील अहमद व इतर एक सदस्याने थेट विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव यांच्याजवळ जात खुळखुळा वाजविण्यास सुरूवात केली.

त्यानंतर, संतप्त झालेल्या अध्यक्षांनी सक्त कारवाईचा इशारा देत मार्शलना खुळखुळा घेऊन जाण्याचा आदेश दिला. सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर या गोंधळामुळे नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता ध्यानात घेत अध्यक्षांनी विरोधी सदस्यांना आसनावर जाण्याची सूचना केली.

संसदीय कामकाज मंत्री विजयकुमार चौधरी यांनीही विरोधकांना जागेवरून हा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले. मात्र, गदारोळ शमण्याची चिन्हे दिसत नसल्याने अध्यक्षांनी प्रथम सकाळी सव्वा अकरा वाजता कामकाज स्थगित केले. त्यानंतर, सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हौद्यात उतरलेल्या विरोधकांनी टेबलही उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. दहा मार्शलनी ते धरून ठेवले.अध्यक्षांनी दुसऱ्यांदा दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.

ओडिशा विधानसभेतही गदारोळ

ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांच्या मुलाने सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यावरून ओडिशा विधानसभेत मंगळवारी, सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला. त्यामुळे, सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. बिजू जनता दलाच्या मुख्य प्रतोद प्रमिला मलिक यांनी मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांच्या निवेदनाची मागणी केली. दास यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी करत पक्षाचे आमदार हौद्यात उतरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT