भुवनेश्वर : ओडिशाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बिजू पटनाईक यांनी अनेक गुप्त मोहिमा पार पाडण्यासाठी उडवलेले डाकोटा विमान हे कोलकता विमानतळावरून भुवनेश्वर येथे आणण्याची तयारी सुरू झाली आहे.
येत्या १४ जानेवारी रोजी मोठ्या अवजड वाहनांतून डाकोटा विमानाचे सुटे भाग भुवनेश्वरला आणण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी राहिलेले बिजू पटनाईक हे वैमानिक होते आणि त्यांनी अनेक धोकादायक अभियानात सहभाग घेतला.
त्यांनी गुप्त मोहिमेद्वारे अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेल्याचे इतिहासाचे अभ्यासक सांगतात. अभ्यासक अनिल धीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांनी १९४७ मध्ये इंडोनेशियाचे तत्कालीन पंतप्रधान सुतन सजहरिर यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी या विमानाचा वापर केला.
त्यामुळे इंडोनेशियाने बिजू पटनाईक यांना दोनदा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भूमिपूत्र’ने गौरविले. राजकारणात येण्यापूर्वी वैमानिक बिजू पटनाईक यांनी कलिंगा एअरलाइन्सची स्थापना केली होती. ब्रिटिश राजवटीत ते रॉयल इंडियन एअर फोर्सचे सदस्य होते.
पाच मार्च रोजी लोकार्पण
विमानतळ प्राधिकरणाने ओडिशा सरकारला भुवनेश्वर विमानतळावर १.१ एकर जमीन दिली आहे. टर्मिनल एक समोरच्या बाजूला लोकांना पाहण्यासाठी डाकोटा विमान ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे येत्या ५ मार्च रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत बीजू पटनाईक यांच्या जन्मदिनी डकोटाचे लोकार्पण करणार आहेत.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरोस्पेस रिसर्च डेव्हलपमेंटचे अभियंते दीक्षा महांती, करुणाकर पंडा, चंदनकुमार पंडित, ऋषिकेश जेना यांच्या नेतृत्वाखालील एक पथक कोलकता विमानतळावर असून त्यांनी डाकोटा विमानाचे भाग वेगळे करण्याचे काम पूर्ण केले आहे. आता हेच पथक भुवनेश्वर येथे या विमानाची जुळणी करणार आहे.
कोरेानामुळे विलंब
कोलकता विमानतळावर अनेक दशकांपासून भग्नावस्थेत असलेल्या डाकोटाची लांबी ६४ फूट ८ इंच आहे. त्याचे पंखे ९५ फूट लांबीचे आहेत. खराब झालेल्या उपकरणाच्या ठिकाणी नवीन उपकरणे बसविण्यात येतील आणि त्यानंतर त्याचे रंगकाम केले जाईल.
विमानाची डागडुजी केली जाणार असून त्यानुसार ते पहिल्यासारखे वाटेल, फरक एवढाच की ते उडू शकणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून डाकोटा विमान ओडिशात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र कोरेाना लाटेमुळे ओडिशा सरकारची योजना बारगळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.