पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) गुरुवारी झालेल्या रेल्वे अपघातातून वाचलेल्या एका प्रवाशाने आपला भयावह अनुभव सांगितला आहे. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या या प्रवाशानं सांगितलं की, "जोरदार धडक झाली आणि मोठा आवाज झाला. मी माझ्या सीटवरून खाली पडलो आणि मग सर्व काही संपलं.” न्यू जलपाईगुडी (Jalpaiguri Train Accident) जिल्ह्यात, बिकानेर-गुवाहाटी ट्रेन रुळावरून घसरल्यानं (Bikaner Express Derailed) पाच जणांचा मृत्यू झाला असून ४५ प्रवासी जखमी झाले आहे. ट्रेनचे 12 डबे रुळावरून घसरले तर काही डबे उलटले.
ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या प्रवक्त्यानं गुवाहाटी येथे सांगितलं की, NFR च्या अलीपुरद्वार विभागात (Bikaner Express Derailed) संध्याकाळी 5 वाजता हा अपघात झाला. अर्धवट खराब झालेला डबा दुसऱ्या डब्यावर आदळल्यानं हा अपघात झाला आणि काही डबे रुळावरून खाली उतरल्याने उलटले. आसपासच्या गावातील शेकडो लोक घटनास्थळी जमले आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. धडकेमुळे काही डबे रेल्वेच्या उर्वरित भागापासून वेगळे झाले, तर काहींची चाके रुळावरून घसरली.
अपघातातून वाचलेल्या संजय नावाच्या प्रवाशानं एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, "संध्याकाळी ५ वाजले होते, मी माझ्या पत्नीशी फोनवर बोलत होतो. अचानक मला मोठा आवाज आला आणि मला जोरदार झटका बसला. यामुळे मी माझ्या सीटवरून खाली पडलो आणि त्यानंतर सर्व काही संपलं. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला रुग्णवाहिकेत नेले जात होते." दुसऱ्या एका जखमीने सांगितलं की, "मी आणि माझी आई चहा घेत असताना मोठा आवाज झाला आणि मोठा धक्का बसला. वरच्या बर्थवर ठेवलेले सामान इकडे तिकडे पडले. स्थानिक लोकांनी माझी सुटका केली, परंतु मी अद्याप माझ्या आईचा शोध घेऊ शकलो नाही. तिचे काय झाले हे मला माहित नाही." जलपाईगुडी जिल्हा अधिकारी मौमिता गोदारा बसू म्हणाल्या, "आम्ही अपघातस्थळावरून तीन मृतदेह बाहेर काढले, तर दोन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात किमान ४५ प्रवासी जखमी झाले आहेत.” दरम्यान, या घटनेतील मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.