Bilkis Bano rape case convicts Release prison 
देश

न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढळलाय ; अत्याचारपीडित बिल्कीस बानो यांची प्रतिक्रिया

बिल्कीस बानो : गुजरात सरकारने चुकीची भरपाई करावी

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : ‘दोषींची तुरुंगातून झालेली सुटका पाहून न्यायव्यवस्थेवरील माझा विश्वास डळमळीत झाला असून मी सुन्न झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया अत्याचारपीडित बिल्कीस बानो यांनी आज व्यक्त केली.

‘गुजरात सरकारने या चुकीची भरपाई करावी आणि कोणत्याही भीतीशिवाय शांततेत जगण्याचा अधिकार आपल्याला पुन्हा बहाल करण्यात यावा,’ असे त्यांनी म्हटले आहे. बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणी २००२ मध्ये अकराजणांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

गुजरात सरकारने मुक्तता धोरणान्वये या सगळ्या दोषींची सोमवारी सुटका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाष्य करताना बिल्कीस बानो म्हणाल्या की, ‘‘ इतका मोठा, अन्यायकारक निर्णय घेण्यापूर्वी कोणीही आपल्या सुरक्षिततेबाबत विचारणा केली नाही. मागील वीस वर्षांपूर्वी झालेला आघात १५ ऑगस्ट २०२२ रोजी पुन्हा माझ्यावर झाला. ज्या अकराजणांनी माझे कुटुंब आणि आयुष्य उद्ध्वस्त केले, ज्यांनी माझी तीन वर्षांची मुलगी हिरावून घेतली ते आज मोकाट फिरत आहेत.’’

बिल्कीस बानो यांचे हे निवेदन त्यांच्या वकील शोभा यांनी प्रसिद्ध केले आहे. ‘या निर्णयाचा माझ्यावर मोठा आघात झाला असून मी अक्षरशः सुन्न झाले आहे. एखाद्या महिलेच्या न्यायाचा अशापद्धतीने कसा काय अंत होऊ शकतो. मी देशातील सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवला होता. मी व्यवस्थेवर विश्वास ठेवला. आता मी हळूहळू या धक्क्यासोबत जगायला शिकत आहे. त्या नराधमांच्या सुटकेमुळे माझ्या आयुष्यातील शांतता भंग झाली असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास देखील डळमळीत झाला आहे.’ असेही बानो यांनी नमूद केले.

सरकारने सुरक्षेची हमी द्यावी

‘दुःख केवळ माझे नाही. न्याय मिळावा म्हणून संघर्ष करणाऱ्या सगळ्या महिलांचे आहे. त्या नराधमांची तुरुंगातून सुटका करण्यात आल्यानंतर आता राज्य सरकारने माझी आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची हमी द्यावी. गुजरात सरकारने या चुकीची भरपाई करावी. माझा भीतीशिवाय शांततेत जगण्याचा अधिकार मला पुन्हा मिळवून द्यावा,’ असेही बिल्कीस बानो यांनी म्हटले आहे.

  • उन्नाव- भाजप आमदाराचा बचाव

  • कथुआ-बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ रॅली

  • हाथरस - सरकारने घेतली बलात्काऱ्यांची बाजू

  • गुजरात- बलात्काऱ्यांची सुटका अन् सन्मान

  • गुन्हेगारांच्या समर्थनातून भाजपच्या महिलांप्रतीच्या निकृष्ट मानसिकता दिसून येते.

  • पंतप्रधानांना अशा राजकारणाची शरम वाटत नाही?

- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT