Biparjoy Cyclone Video 
देश

Biparjoy Cyclone Video : किनारपट्टीला चक्रीवादळाची चाहूल; थरार उडवणारे समुद्रातील व्हिडिओ समोर

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अरबी समुद्रातील बिपारजोय हे चक्रीवादळ हे वेगाने भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने येत असून गुरूवारी गुजरातेतील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला येऊन धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सरकारने त्या भागात रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांचे स्थलांतर केले आहे. तर या चक्रीवादळाचे थरारक व्हिडिओ आता समोर आले आहेत.

या चक्रीवादळामुळे येणाऱ्या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून पथके तैनात करण्यात आली आहेत. भारतीय तटरक्षक दलाची जहाजे गुजरातच्या किनारपट्टीवर गस्त घालत आहेत. तर या चक्रीवादळाचे पडसाद समुद्रकिनाऱ्यावर उमटले असून समुद्र खवळल्याने लाटांचा वेग वाढला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये समुद्रात गस्त घालत असलेल्या जहाजामध्ये लाटांचे पाणी घुसत असल्याचं दिसत आहे. तर किनाऱ्यावरसुद्दा लाटांचा वेग वाढला आहे. या चद्रीवादळाचे पडसाद मुंबईतसुद्धा दिसून येत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय हे पूर्व मध्य अरबी समुद्रावर पोरबंदरपासून नैऋत्येस सुमारे 290 किमी आणि जाखाऊ बंदरापासून दक्षिण-नैऋत्येस 360 किमीवर स्थित आहे. 15 जून संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT